मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs SRH: पुन्हा ट्रेव्हिस हेडची बॅट तळपली; सनरायझर्स हैदराबादचा दिल्लीवर ६७ धावांनी विजय

DC vs SRH: पुन्हा ट्रेव्हिस हेडची बॅट तळपली; सनरायझर्स हैदराबादचा दिल्लीवर ६७ धावांनी विजय

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 21, 2024 12:04 AM IST

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ६७ धावांनी विजय मिळवला आहे.

आयपीएल २०२४: सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.
आयपीएल २०२४: सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ३५ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा ६७ धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सात विकेट गमावून २६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीच्या षटकांत हैदराबादला कडवी झुंज दिली. मात्र, सातत्याने विकेट पडल्यामुळे दिल्लीचा संघ १९.१ षटकात १९९ धावांवर सर्वबाद झाला. सनरायझर्स हैदराबाद संघ पाचव्या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या पराभवासह सातव्या स्थानावर घसरला.

ट्रेंडिंग न्यूज

IPL 2024: एमएस धोनीचं वेड; चाहत्यानं चेन्नई सुपरकिंग्जच्या थीमवर बनवली स्वत:च्या लग्नाची पत्रिका

२६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. दिल्लीने पहिल्या दोन षटकांतच सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (एक धाव) आणि पृथ्वी शॉ (१६ धावा) यांच्या विकेट्स गमावल्या. फ्रेझरने १८ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. परंतु, मार्कंडेने त्याला झेलबाद केले. तर, अभिषेक पौरेल २२ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. ट्रिस्टन स्टब्सला केवळ १० धावा करता आल्या. ललित यादवने ७, अक्षर पटेलने ६, एनरिक नार्खिया ​​आणि कुलदीप यादव खाते न उघडता बाद झाले. कर्णधार ऋषभ पंतने ३५ चेंडूत ४४ धावा केल्या. हैदराबादकडून नटराजनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

Fact Check: मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधीच ठरतं टॉस कोण जिंकणार? व्हायरल बातमीमागील सत्य समोर

हैदराबादची तुफानी फलंदाजी

सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ विकेट गमावून २६६ धावा केल्या. आयपीएल २०२४ मध्ये तिसऱ्यांदा सनरायझर्स हैदराबादने २५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या २८७/३ केली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही सनरायझर्स हैदराबादच्या सलामीच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी झाली. मात्र, त्यानंतर लागोपाठ षटकांत संघाने विकेट गमावल्या, त्यामुळे संघ ३०० धावांचा टप्पा पार करू शकला नाही.

पाच षटकांत १०० धावा

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने सुरू असलेल्या मोसमातील सर्वात स्फोटक सुरुवात केली. सनरायझर्स हैदराबादने अवघ्या पाच षटकांत १०० धावा पूर्ण केल्या. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने १६ चेंडूत अर्धशतक झळकावले. सनरायझर्स हैदराबादची पहिली विकेट १३१ धावांवर पडली. अभिषेक शर्मा १२ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. त्याला कुलदीप यादवने बाद केले. यानंतर त्याने एडन मार्करामलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कुलदीपने ट्रॅव्हिस हेडलाही बाद केले. हेड ३२ चेंडूत ८९ धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने हेनरिक क्लासेनला बाद केले. क्लासेन ८ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. नितीशने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. कुलदीप यादवने त्याला बाद केले. अब्दुल समदने ८ चेंडूत १३ धावांची खेळी केली. शाहबाज अहमदने २९ चेंडूत ५९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

IPL_Entry_Point