श्श्श्श साइलेंट…. धोनीच्या फॅन्सची अशी मजा कोणीच घेतली नसेल, कमिन्सच्या चाहत्यानं सर्वांेना शांत केलं, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  श्श्श्श साइलेंट…. धोनीच्या फॅन्सची अशी मजा कोणीच घेतली नसेल, कमिन्सच्या चाहत्यानं सर्वांेना शांत केलं, पाहा

श्श्श्श साइलेंट…. धोनीच्या फॅन्सची अशी मजा कोणीच घेतली नसेल, कमिन्सच्या चाहत्यानं सर्वांेना शांत केलं, पाहा

Apr 06, 2024 06:12 PM IST

IPL 2024 SRH vs CSK : चेन्नई सुपर किंग्जला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर आता या सामन्याशी संबंधित एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे.

श्श्श्श साइलेंट…. धोनीच्या फॅन्सची अशी मजा कोणीच घेतली नसेल, कमिन्सच्या चाहत्यानं सर्वांेना शांत केलं, पाहा
श्श्श्श साइलेंट…. धोनीच्या फॅन्सची अशी मजा कोणीच घेतली नसेल, कमिन्सच्या चाहत्यानं सर्वांेना शांत केलं, पाहा

आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ५ विकेट गमावत १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने १६ चेंडू बाकी असताना ४ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.

हैदराबादसाठी एडन मार्करामने ३६ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावांची खेळी केली.

दरम्यान, आता या सामन्याशी संबंधित एक मनोरंजक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये सनरायझर्स हैदराबादचा एक चाहता चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांची मजा घेताना दिसत आहे. त्याच्या हातात एक पोस्टरही दिसत आहे. 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने १८.१ षटकांत लक्ष्य गाठले.

व्हिडीओत नेमकं काय?

वास्तविक, एक्सवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत हैदराबादचा एक चाहता चेन्नईच्या समर्थकांना शांत राहण्याचा इशारा करताना दिसत आहे. त्याच्या हातात पोस्टर आहे. त्या पोस्टरवर सीएसके विरुद्ध हैदराबाद सामन्याशी संबंधित एक मजेशीर स्केच तयार करण्यात आले आहे. एक व्यक्ती सीएसकेच्या सिंहाला श्श्श्श असे करून शांत राहण्याचा इशारा करत असल्याचे, या स्केचमधून दाखवण्यात आले आहे.

यानंतर आता या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, श्श्श्श असा शांत राहण्याचा इशारा करणे ही पॅट कमिन्सची सिग्नेचर स्टाईल झाली आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये कमिन्सने एक लाख लोकांना शांत करण्याचे वक्तव्य केले होते, तेव्हापासून कमिन्सची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. 

सामन्यात काय घडलं?

सामन्याबाबत बोलायचे झाले तर, सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १६५ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून शिवम दुबेने २४ चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक ४५ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. रवींद्र जडेजाने नाबाद ३१ धावा केल्या. जडेजाने २३ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार मारले. 

प्रत्युत्तरात हैदराबादने १८.१ षटकांत सामना जिंकला. त्यांच्याकडून एडन मार्करामने अर्धशतक झळकावले. त्याने ३६ चेंडूत ५० धावा केल्या. मार्करामने ४ चौकार आणि १ षटकार लगावला.

सीएसकेचा सलग दुसरा पराभव

चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे. हैदराबादपूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडूनही त्यांचा पराभव झाला होता. दिल्लीने २० धावांनी विजय मिळवला होता. तर चेन्नईने पहिले दोन सामने जिंकले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेट्सने पराभव केला. यानंतर त्यांनी गुजरात टायटन्सचा ६३ धावांनी पराभव केला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या