मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  साडेचार हजारांचं तिकिट काढलं, पण मैदानात त्या नंबरची सीटच नव्हती, IPL मध्ये चाहत्यासोबत फसवणूक!

साडेचार हजारांचं तिकिट काढलं, पण मैदानात त्या नंबरची सीटच नव्हती, IPL मध्ये चाहत्यासोबत फसवणूक!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 06, 2024 10:56 PM IST

हैदराबाद आणि सीएसके यांच्यातील सामना पाहण्यासाठी गेलेल्या एका चाहत्यासोबत फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चाहता स्टेडियममध्ये सामना पाहण्यास गेला आहे. पण त्याच्या तिकिटावर लिहिलेला सीट नंबर त्याला स्टेडियममध्ये गेल्यावर मिळला नाही.

ipl 2024 : साडेचार हजारांचं तिकिट काढलं, पण मैदानात त्या नंबरची सीटच नव्हती
ipl 2024 : साडेचार हजारांचं तिकिट काढलं, पण मैदानात त्या नंबरची सीटच नव्हती

IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये शुक्रवारी (५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेला सामना खूपच रोमांचक झाला, पण एका चाहत्यासाठी हा सामना त्याच्या जीवनातील अतिशय वाईट अनुभव ठरला.

ट्रेंडिंग न्यूज

हैदराबाद आणि सीएसके यांच्यातील सामना पाहण्यासाठी गेलेल्या एका चाहत्यासोबत फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चाहता स्टेडियममध्ये सामना पाहण्यास गेला आहे. पण त्याच्या तिकिटावर लिहिलेला सीट नंबर त्याला स्टेडियममध्ये गेल्यावर मिळला नाही.

या चाहत्याने या सीटसाठी ४,५०० रुपये दिले होते, पण तो मैदानावर पोहोचला तेव्हा त्याला जागा मिळाली नाही.

जुनैद अहमद नावाच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली आहे. त्याच्या तिकिटावर सीट क्रमांक J-66 लिहिलेला होता, मात्र तो मैदानात गेल्यानंतर त्याला या नंबरची सीटच मिळाली नाही.

ग्राउंडवर उपस्थित कर्मचारी मदतीसाठी पुढे आले तेव्हा त्यांच्याही लक्षात आल की, J65 नंतरचा सीट क्रमांक थेट J67 होता.

यानंतर आता या चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत व्यवस्थापनाकडे नुकसान भरपाईची विनंती केली आहे. त्याला त्याचे पैसे परत मिळावेत, अशी त्याची मागणी होती.

पण या घटनेने सामन्याच्या दुसऱ्या डावात एक रंजक वळण घेतले. कारण दुसऱ्या डावात जुनैदला त्याची सीट मिळाली. जुनेदने सांगितले की सीट नंबर देताना कोणीतरी चूक केली असावी. त्याला J69 आणि J70 मधील सीट नंबर मिळाला होता.

हैदराबादने सामना जिंकला

जुनैद अहमदसाठी हैदराबाद आणि सीएसके सामन्याचा अनुभव फारसा चांगला नव्हता. मात्र, या दोन्ही संघांमधील सामना खूपच रोमांचक होता. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १६५ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला सनरायझर्स हैदराबाद संघ मधल्या षटकांमध्येही संघर्ष करताना दिसला, मात्र अखेरीस ६ विकेट्स राखून सामना जिंकला.

IPL_Entry_Point