मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 schedule : आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कधी? वाचा संपूर्ण माहिती

IPL 2024 schedule : आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कधी? वाचा संपूर्ण माहिती

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 22, 2024 07:29 PM IST

Tata IPL 2024 Schedule : भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट फॉरमॅट असलेल्या आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.

Tata IPL 2024 Schedule
Tata IPL 2024 Schedule

Tata IPL 2024 Schedule : तमाम क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या १७ व्या इंडियन प्रीमियर लीगचं वेळापत्रक आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) जाहीर केलं. आज जाहीर झालेलं वेळापत्रक पहिल्या १७ दिवसांचं असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.

लोकसभेची आगामी निवडणूक एप्रिल व मे महिन्यात होणार आहे. या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय संपूर्ण वेळापत्रक नंतर जाहीर करणार आहे.

बीसीसीआयनं आज एकूण २१ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिला सामना २२ मार्च रोजी रात्री ८ वाजता खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुपारचे सामने ३.३० वाजता आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरू होतील. या कालावधीत चाहत्यांना एकूण चार डबल हेडर सामने पाहायला मिळतील.

आयपीएल २०२४ वेळापत्रक

CSK विरुद्ध RCB (२२ मार्च) - रात्री ७.३० वा. (चेन्नई)

PBKS विरुद्ध DC (२३ मार्च ) दुपारी ३.३० वा. (मोहाली)

KKR विरुद्ध SRH (२३ मार्च ) रात्री ७.३० वा. (कोलकाता)

RR विरुद्ध LSG (२४ मार्च ) दुपारी ३.३० वा. (जयपूर)

GT विरुद्ध MI (२४ मार्च ) रात्री ७.३० वा. (अहमदाबाद)

RCB विरुद्ध PBKS (२५ मार्च ) रात्री ७.३० वा. (बेंगळुरू)

CSK विरुद्ध GT (२६ मार्च ) रात्री ७.३० वा. (चेन्नई)

SRH विरुद्ध MI (२७ मार्च ) रात्री ७.३० वा. (हैदराबाद)

RR विरुद्ध DC (२८ मार्च ) रात्री ७.३० वा. (जयपूर)

RCB विरुद्ध KKR (२९ मार्च ) रात्री ७.३० वा. (बेंगळुरू)

LSG विरुद्ध PBKS (३० मार्च ) ७.३० वा. (लखनौ)

GT विरुद्ध SRH ( ३१ मार्च ) दुपारी ३:३० (अहमदाबाद)

DC विरुद्ध CSK (३१ मार्च ) रात्री ७.३० वा. (विशाखापट्टणम)

MI विरुद्ध RR (१ एप्रिल ) रात्री ७.३० वा. (मुंबई)

RCB विरुद्ध LSG (२ एप्रिल ) रात्री ७.३० वा. (बेंगळुरू)

DC विरुद्ध KKR (३ एप्रिल ) रात्री ७.३० वा. (विशाखापट्टणम)

GT विरुद्ध PBKS (४ एप्रिल) रात्री ७.३० वा. (अहमदाबाद)

SRH विरुद्ध CSK ( ५ एप्रिल ) रात्री ७.३० वा. (हैदराबाद)

RR विरुद्ध RCB ( एप्रिल ६ ) रात्री ७:३० वा. (जयपूर)

MI विरुद्ध DC (७ एप्रिल) दुपारी ३.३० वा. (मुंबई)

LSG विरुद्ध GT (७ एप्रिल) - रात्री ७:३० वा. (लखनौ)

 

WhatsApp channel