Rishabh Pant : ऋषभ पंत जबरदस्त लयीत, सराव सत्रातील सुंदर शॉट्स व्हायरल, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rishabh Pant : ऋषभ पंत जबरदस्त लयीत, सराव सत्रातील सुंदर शॉट्स व्हायरल, पाहा

Rishabh Pant : ऋषभ पंत जबरदस्त लयीत, सराव सत्रातील सुंदर शॉट्स व्हायरल, पाहा

Published Mar 15, 2024 11:17 AM IST

Rishabh Pant Practice Video : ऋषभ पंतच्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सरावादरम्यान अतिशय सुंदर शॉट्स खेळताना दिसत आहे.

Rishabh Pant Practice Video : ऋषभ पंत जबरदस्त लयीत, सराव सत्रातील सुंदर शॉट्स व्हायरल, पाहा
Rishabh Pant Practice Video : ऋषभ पंत जबरदस्त लयीत, सराव सत्रातील सुंदर शॉट्स व्हायरल, पाहा

Rishabh Pant IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) १७ व्या मोसमामाला सुरुवात होण्यास आता केवळ ७ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आयपीएलचा पहिला सामना (२२ मार्च) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जाईल.

तर आयपीएलचे सर्वच संघ या स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहेत. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सच्या ट्रेनिंग कॅम्पमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ऋषभ पंतचा आहे.

वास्तविक, क्रिकेट चाहते ऋषभ पंतच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंत आयपीएल २०२४ च्या माध्यमातून मैदानात परतणार आहे. या स्पर्धेसाठी पंत सराव करत आहे. कार अपघातामुळे पंत बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर होता. पण पंतने आता दिल्ली कॅपिटल्सच्या सराव शिबिरात चांगलाच घाम गाळला.

ऋषभ पंतच्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सरावादरम्यान अतिशय सुंदर शॉट्स खेळताना दिसत आहे. पंतने हेलिकॉप्टरसारखे शॉट खेळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पंतचा हा शॉट बघून तो चांगल्या लयीत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २३ मार्चला होणार आहे. दिल्ली आपल्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सला भिडणार आहे. हा सामना चंदीगड येथे खेळला जाईल.

पंतचा डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघात

ऋषभ पंतचा डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघात झाला होता. त्या अपघातात पंत गंभीर जखमी झाले होता. यामुळे तो गेल्या आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सने डेव्हिड वॉर्नरला कर्णधार बनवले. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघाने अतिशय खराब कामगिरी केली होती, त्यावेळी ते गुणतालिकेत ९व्या स्थानावर होते.

तथापि, पंत आयपीएल २०२४ मध्ये कर्णधार म्हणून खेळणार की नाही हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. आता या स्पर्धेत पंत कोणत्या क्षमतेने खेळताना दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या