IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा पंधरावा सामना खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरुच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघाने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे.
या सामन्यात आरसीबीने त्यांच्या संघात एक बदल केला. अल्झारी जोसेफऐवजी रीस टोप्लीला संघात स्थान देण्यात आले. याशिवाय, लखनौच्या संघाने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये देखील एक बदल केला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे मोहसीन खानला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी यश ठाकूरला संघात स्थान देण्यात आल्याचे लखनौचा कर्णधार केएल राहुल म्हणाला.
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (डब्ल्यू), मयंक डागर, रीस टोपले, मोहम्मद सिराज, यश दयाल.
सब्सिट्युट: मणिमारन सिद्धार्थ, शामर जोसेफ, दीपक हुडा, अमित मिश्रा, कृष्णप्पा गौथम.
क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), केएल राहुल (क), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव
सब्सिट्युट: सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंह.