RCB vs LSG Live Streaming: आरसीबी आणि लखनौ यांच्यात आज लढत; कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs LSG Live Streaming: आरसीबी आणि लखनौ यांच्यात आज लढत; कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना?

RCB vs LSG Live Streaming: आरसीबी आणि लखनौ यांच्यात आज लढत; कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना?

Apr 02, 2024 03:34 PM IST

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live streaming: आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज आयपीएल २०२४ मधील १५ वा सामना खेळला जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज आयपीएल २०२४ मधील १५ वा सामना खेळला जाणार आहे.

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज आयपीएल २०२४ चा सामना रंगणार आहे. आरसीबी सध्या तीन सामन्यांत एक विजय आणि दोन पराभवासह दोन गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. तर, एलएसजी दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभवासह दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.आरसीबीला मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सहा विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी पंजाबविरुद्ध चार विकेट्स राखून विजय मिळवत पुनरागमन केले. परंतु, तिसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारखे खेळाडू खराब कामगिरी करीत आहेत. दिनेश कार्तिक आरसीबीसाठी फॉर्मात असलेला एकमेव फलंदाज आहे. अनुज रावतने मोहिमेची सुरुवात शानदार केली, पण मागील दोन सामन्यांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.

IPL 2024 Fatest Ball: जेराल्ड कोएट्झीनं टाकला यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू, मयंक यादवचा विक्रम मोडला!

दरम्यान, लखनौने राजस्थानविरुद्ध पराभवासह आपल्या मोसमाची सुरुवात केली. त्यानंतर पंजाबविरुद्ध सामन्यात २१ धावांनी विजय मिळवून पुनरागमन केले.लखौनाचा फलंदाज विकेटकिपर क्विंटन डी कॉकने मागील सामन्यात अर्धशतक झळकावले होते. परंतु, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस आणि आयुष बदोनी हे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत आणि त्यांच्यापैकी एकाला लवकरच प्लेइंग इलेव्हनमधून स्थान गमवावे लागू शकते.

MI vs RR : हार्दिक पंड्याने केली पराभवाची हॅट्ट्रिक! तर सलग तीन विजयांसह संजूचा संघ गुणतालिकेत अव्वल

कधी कुठे पाहायचा सामना?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मंगळवारी (२ एप्रिल) आयपीएल २०२४ मधील १५ वा सामना खेळवला जाईल. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग