IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा बालेकिल्ला असलेल्या चेपॉक येथे काल झालेल्या आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात बंगळुरूच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरुच्या संघाने चेन्नईसमोर १७४ धावांचे लक्ष्य ठेवले, जे चेन्नईच्या संघाने सहा विकेट्स राखून गाठले. या सामन्यातील विराट कोहलीचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो विरुद्ध संघातील खेळाडूला शिवीगाळ करत असल्याचा दावा केला जात आहे.
धावचा बचाव करण्यासाठी बेंगळुरूचा संघ आला, तेव्हा मैदानात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर रचिन रवींद्र स्फोटक अंदाजात फलंदाजी करत होता. रचिन रवींद्र चेन्नईला एकतर्फी सामना जिंकून देईल,असे वाटत असताना आरसीबीचा गोलंदाज कर्ण शर्माने सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, त्याचवेळी विराट कोहलीने दिलेली रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यात तो रचिन रवींद्र काहीतरी बोलताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ विराट कोहली रचिन रवींद्रला शिवीगाळ करत असल्याचा दावा केला जात आहे.
चेन्नई सुपरकिंग्जचा नवा कर्णधार रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२४ मोहिमेची विजयी सुरुवात केली. रवींद्र व्यतिरिक्त अजिंक्य रहाणे (२७, धावा), शिवम दुबे (नाबाद ३४ धावा) आणि रवींद्र जडेजा (नाबाद २५ धावा) यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत चेन्नईला केवळ १८.४ षटकांत विजय मिळवून दिला.
बंगळुरुविरुद्ध विजयानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला की, "आमच्या संघातील प्रत्येकजण स्ट्रोक-प्लेअर आहे, अगदी रहाणेसुद्धा. फलंदाजीत प्रत्येकाची भूमिका स्पष्ट आहे. बऱ्याच सकारात्मक गोष्टी आहेत, पण दोन-तीन गोष्टींवर काम करायचे बाकी आहे."
संबंधित बातम्या