मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 Promo : आयपीएलचा प्रोमो बघितला का? अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा खतरनाक अंदाज

IPL 2024 Promo : आयपीएलचा प्रोमो बघितला का? अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा खतरनाक अंदाज

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 14, 2024 07:14 PM IST

IPL 2024 Promo : सीएसके आणि आरसीबी यांच्यातील उद्घाटनाच्या सामन्यापूर्वी एक धमाकेदार प्रोमो लॉंच करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफही दिसत आहे.

IPL 2024 Promo : आयपीएलचा प्रोमो बघितला का? अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा खतरनाक अंदाज
IPL 2024 Promo : आयपीएलचा प्रोमो बघितला का? अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा खतरनाक अंदाज

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) १७ व्या मोसमामाला सुरुवात होण्यास आता केवळ ८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आयपीएलचा पहिला सामना (२२ मार्च) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

दरम्यान, सीएसके आणि आरसीबी यांच्यातील उद्घाटनाच्या सामन्यापूर्वी एक धमाकेदार प्रोमो लॉंच करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफही दिसत आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याचा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच, काही वेळातच हा प्रोमो चाहत्यांना चांगलाच आवडल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दिसत आहेत. प्रोमो रीलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ एम धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तर रॉयल चॅलेंर्स बंगळुरूची धुरा फाफ डु प्लेसिसच्या हातात आहे. दोन्ही संघांमध्ये रंगणारा हा उद्घाटनाचा सामना खूपच थरारक होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या मोसमात म्हणजेच, आयपीएल २०२३ मध्ये सीएसके आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल फायनल झाली होती. तेव्हा रविंद्र जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सीएसकेला चॅम्पियन बनवले होते.

अशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलच्या इतिहासात ५ वेळा चॅम्पियन बनणारा दुसरा संघ ठरला. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचदा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे.

IPL 2013 मध्ये मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच चॅम्पियन बनली होती. यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये मुंबईने विजेतेपद पटकावले. तर चेन्नई सुपर किंग्सने २०१० मध्ये आयपीएलचे पहिले जेतेपद पटाकवले होते. त्यानंतर २०११,२०१८, २०२१ आणि २०२३ मध्येही सीएसकेने आयपीएल जेतेपद आपल्या नावावर केले होते.

WhatsApp channel