Orange And Purple Cap In IPL 2024 : आयपीएलच्या प्रत्येक मोसमात संघ हे ट्रॉफीसाठी लढत असतात तर खेळाडूंमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप मिळवण्यासाठी चुरस रंगलेली असते. यंदाच्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या रेसमध्ये युवा खेळाडूंनी बाजी मारली आहे.
दरम्यान, ऑरेंज कॅप हा फलंदाजांचा मानाचा मुकुट आहे आणि पर्पल कॅप ही गोलंदाजांचा मुकुट आहे. चला तर मग जाणून घेऊया की सध्या कोणते खेळाडू आयपीएल २०२४ च्या मानाच्या मुकुटांसाठी लढत आहेत.
सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहलीकडे ऑरेंज कॅपचा ताबा आहे. कोहलीने ४ सामन्यात २०३ धावा केल्या आहेत. आता या शर्यतीत सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माही सामील झाला आहे. अभिषेक १६१ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. या यादीत दुसरा क्रमांक राजस्थानच्या रियान परागचा आहे, रियानने ३ सामन्यात १८१ धावा केल्या आहेत.
त्यानंतर हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेन तिसऱ्या स्थानावर आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल चौथ्या स्थानावर आहे. क्लासेनने आतापर्यंत ४ सामन्यात १७७ धावा केल्या आहेत, तर शुभमन गिलने ४ सामन्यात १६४ धावा केल्या आहेत.
यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. मोहितने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यात १८.७१ च्या सरासरीने ७ विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याने ८.१८ च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आहे. मुस्तफिजूरने ३ सामन्यात १५.१४ च्या सरासरीने ७ विकेट घेतल्या आहेत. त्याने ८.८३ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.
लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवचाही पर्पल कॅपच्या शर्यतीत समावेश आहे. मयंकने २ सामन्यात ६.८३ च्या उत्कृष्ट सरासरीने ६ विकेट घेतल्या असून तो यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल चौथ्या आणि दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमद पाचव्या स्थानावर आहे. चहलने ९.१६ च्या सरासरीने ६ तर खलीलने २१.८३ च्या सरासरीने ६ विकेट्स घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या