IPL 2024: मुंबईचे वानखेडे स्टेडियम गुरुवारी मोठ्या आयपीएल सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ११ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा एकमेकांच्या समोर असतील. यापूर्वी, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहता येईल, याबाबत जाणून घेऊयात.
यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत वानखेडे स्टेडियमवर केवळ दोनच सामने खेळले गेले आहेत. यातील एक सामना संध्याकाळी झाला. संध्याकाळी खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थानविरुद्ध २० षटकांत ९ विकेट गमावून फक्त १२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने अवघ्या १५.३ षटकांत हा सामना जिंकला. राजस्थानचे सलामीचे फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर लवकर बाद झाले. यानंतर रियान पराग आला आणि त्याने डावाची धुरा सांभाळली आणि संघाला विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मंगळवारी (११ एप्रिल २०२४) आयपीएलमधील २५वा सामना खेळला जाईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल, क्वेना मफाका, नमन धीर, नेहल वढेरा, शम्स मुलानी, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस.
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, सौरव चौहान, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, हिमांशू शर्मा, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमर, विजय कु. विशक, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, विल जॅक्स, अनुज रावत, मनोज भंडागे, आकाश दीप, राजन कुमार.