Video : याला टी-20 वर्ल्डकप खेळायचा आहे… रोहित शर्मानं घेतली दिनेश कार्तिकची मजा, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : याला टी-20 वर्ल्डकप खेळायचा आहे… रोहित शर्मानं घेतली दिनेश कार्तिकची मजा, पाहा

Video : याला टी-20 वर्ल्डकप खेळायचा आहे… रोहित शर्मानं घेतली दिनेश कार्तिकची मजा, पाहा

Apr 12, 2024 03:48 PM IST

Rohit Sharma-Dinesh Karthik : आरसीबीकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकं ठोकली तर मुंबईच्या दोन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. या सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात एक गोड वादही पाहायला मिळाला.

rohit sharma dinesh karthik : याला टी-20 वर्ल्डकप खेळायचा आहे… रोहित शर्मानं घेतली दिनेश कार्तिकची मजा, पाहा
rohit sharma dinesh karthik : याला टी-20 वर्ल्डकप खेळायचा आहे… रोहित शर्मानं घेतली दिनेश कार्तिकची मजा, पाहा

आयपीएल २२०४च्या २५ व्या सामन्यात (११ एप्रिल) मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. वानखेडेवर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने बेंगळुरूचा ७ विकेटने पराभव केला. या सामन्यात एकूण ५ अर्धशतके पाहायला मिळाली. 

आरसीबीकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकं ठोकली तर मुंबईच्या दोन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. या सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात एक गोड वादही पाहायला मिळाला.

आरसीबीच्या दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्याने मुंबईच्या वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. कार्तिकने १६व्या षटकात आकाश मधवालला टार्गेट करताना ४ चौकार मारले. 

गेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह यांच्याविरुद्धही त्याने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला आणि फटकेबाजी केली. कार्तिकची फलंदाजी पाहून रोहित शर्माही खूश झाला होता. त्याने कार्तिकच्या जवळ जात त्याला डिवचले.

'याला विश्वचषक खेळायचा आहे...'

मुंबईच्या गोलंदाजांची होत असलेली धुलाई पाहून रोहित शर्मा कार्तिककडे गेला आणि त्याला छेडत म्हणाला, "आपल्याला विश्वचषकाच्या निवडीसाठी त्याला पुढे करायचे आहे. याच्याही (कार्तिक) मनात हेच चालले आहे. याला विश्वचषक खेळायचा आहे." 

रोहितचे हे विधान स्टंप माईकवर टिपले गेले. रोहित आणि कार्तिक यांच्यात झालेल्या या गोड संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्ममध्ये

आयपीएलमध्ये दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात सीएसकेविरुद्ध २८ चेंडूत ३८ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने पंजाबविरुद्ध २८ धावांची खेळी खेळली. कार्तिकने केकेआरविरुद्ध झटपट २० धावा केल्या होत्या. त्याचवेळी आता त्याने मुंबईविरुद्ध या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले. २३ चेंडूंचा सामना करताना कार्तिकने ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ५३ धावा केल्या.

सामन्यात काय घडलं?

या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून कार्तिक, फाफ डुप्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतकं केली. 

या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने तुफानी फलंदाजी केली. त्यांनी अवघ्या ८ षटकात १०० धावा फलकावर लावल्या. तर १५.३ षटकात लक्ष्य गाठले. या सामन्यानंतर आयपीएल २०२४ च्या पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स आता सातव्या स्थानावर पोहोचली आहे. आरसीबीचा ६ सामन्यांमधला हा पाचवा पराभव असून ते पॉइंट टेबलमध्ये ९व्या स्थानावर आहेत.

Whats_app_banner