मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs LSG Toss Report: लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकला, चेन्नई सुपरकिंग्ज प्रथम फलंदाजी करणार

CSK vs LSG Toss Report: लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकला, चेन्नई सुपरकिंग्ज प्रथम फलंदाजी करणार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 23, 2024 07:55 PM IST

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलमधील ३९ वा सामना खेळला जात आहे.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (AP)

IPL 2024: आयपीएलच्या ३९व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनौने संघात कोणताही बदल केलेला नाही. तर, चेन्नई सुपर किंग्जने आज आपल्या संघात एक बदल केला आहे. अनेक सामने फ्लॉप ठरलेल्या रचिन रवींद्रला वगळण्यात आले असून डॅरेल मिशेलला संधी देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या स्पर्धेत दुसऱ्यांना एकमेकांशी भिडणार आहे. यापूर्वी दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौने चेन्नईचा पराभव केला होता. लखनौ- चेन्नई यांच्यातील पहिला सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळला जाणार गेला. मात्र, दुसरा सामना चेन्नईचा बालेकिल्ला असलेल्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यामुळे हा सामन्यात अत्यंत रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.

भारतीय वेळेनुसार, चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

हेड टू हेड रेकॉर्ड

चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आतापर्यंत आयपीएलचे तीन सामने खेळले गेले. यातील दोन सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने विजय मिळवला आहे. तर, एक सामना चेन्नई सुपरकिंग्जने जिंकला आहे.

लखनौची प्लेईंग इलेव्हन:

केएल राहुल (कर्णधारस, विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आशुष बडोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी विश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर

इम्पॅक्ट: देवदत्त पडिक्कल, कृष्णप्पा गौतम, युधवीर, सिद्धार्थ

चेन्नईची प्लेईंग इलेव्हन:

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरेल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, एम पाथीराना.

इम्पॅक्ट: समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, रशीद शेख, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर

IPL_Entry_Point