KKR vs SRH Dream11 Prediction : आज स्टार्क-कमिन्स आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs SRH Dream11 Prediction : आज स्टार्क-कमिन्स आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

KKR vs SRH Dream11 Prediction : आज स्टार्क-कमिन्स आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

Published Mar 23, 2024 11:09 AM IST

ipl 2024 kkr vs srh dream 11 prediction : आजच्या सामन्यात या सामन्यात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्यातील चुरस पाहायला मिळणार आहे. हे दोघे आयपीएलचे सर्वात महागडे खेळाडू आहेत.

KKR vs SRH Dream11 Prediction : आज स्टार्क-कमिन्स आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
KKR vs SRH Dream11 Prediction : आज स्टार्क-कमिन्स आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

ipl 2024 kkr vs srh dream 11 prediction :  इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा (IPL 2024) तिसरा सामना ब्लॉकबस्टर असणार आहे. कारण आयपीएल २०१६ चा विजेता संघ सनरायझर्स हैदराबाद दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सला भिडणार आहे. हा सामना आज शनिवारी (२३ मार्च) कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर संध्याकाळी ७:३० वाजता खेळवला जाईल. 

विशेष म्हणजे, या सामन्यात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्यातील चुरस पाहायला मिळणार आहे. हे दोघे आयपीएलचे सर्वात महागडे खेळाडू आहेत.

या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मिचेल स्टार्कला मोठ्या रकमेत विकत घेतले होते. तो ९ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे.

पॅट कमिन्स SRH चे नशीब बदलणार?

तर सनरायझर्स हैदराबादने (SRH) यंदा नवीन कर्णधाराची नियुक्ती केली आहे. हैदराबादने पॅट कमिन्सला आयपीएल लिलावात २०.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आणि थेट कर्णधार बनवले.  

केकेआर वि. हैदराबाद ड्रीम इलेव्हन संभाव्य संघ (kkr vs srh dream 11 team)

विकेटकीपर- हेनरिक क्लासेन, रहमानउल्लाह गुरबाज

फलंदाज- ट्रॅव्हिस हेड, रिंकू सिंग (उपकर्णधार), एडन मार्कराम

अष्टपैलू खेळाडू- आंद्रे रसेल (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, पॅट कमिन्स, सुनील नरेन

गोलंदाज- भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती

केकेआर वि. हैदराबाद संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग इलेव्हन- ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, पॅट कमिन्स (कर्णधार), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या