KKR vs RR: अखेरच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सला हरवलं
राजस्थानने कोलकाताविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. २० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या चक्रवर्तीच्या पहिल्याच चेंडूवर बटलरने षटकार ठोकला. यानंतर चक्रवर्ती तीन डॉट बॉल टाकले. बटलरने पाचव्या चेंडूवर दोन धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूवर राजस्थानने हा सामना जिंकला.या सामन्यात बटलरने नाबाद १०७ धावा केल्या.
Jos Buttler: जोस बटलरनं झळकावलं अर्धशतक
जोस बटलरने ३६ चेंडूत पन्नास धावा केल्या आहेत. त्याने १५ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली. त्याने चार चौकार मारले. आयपीएलमधील बटलरचे हे २० वे अर्धशतक आहे. बटल ५८ धावा करून क्रीजवर असून रोव्हमन पॉवेलने २ धावा केल्या आहेत.
KKR vs RR: अंगकृष्ण रघुवंशी ठरला कुलदीप सेनचा शिकार
कोलकात्याची दुसरी विकेट अंगक्रिश रघुवंशीच्या रूपाने पडली. तो ११ व्या षटकात कुलदीप सेनचा बळी ठरला. रघुवंशीने १८ चेंडूत ३० धावा केल्या. त्याने पाच चौकार मारले. त्याने नरेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावा जोडल्या. नारायण ६६ धावा करून खेळत आहे. त्याला साथ देण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला आहे.
Rajasthan Royals Playing 11: राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकिपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल
KKR Playing 11: कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग इलेव्हन
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), सुनील नारायण, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंह, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
KKR vs RR Toss Report: राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार
राजस्थानने नाणेफेक जिंकून कोलकाताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की, आम्हाला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणे चांगले ठरू शकते.
KKR vs RR Last Matches Result: केकेआर आणि आरआर यांच्यातील शेवटच्या सामन्यातील निकाल
आयपीएल २०२४ मध्ये कोलकात्याच्या मैदानावर आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. केकेआरने २३ मार्च रोजी २०८/७ धावा केल्या आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४ धावांनी रोमांचक विजय नोंदवला. केकेआरचा दुसरा सामना एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होता. या सामन्यात केकेआरने १५.४ षटकात १६२ धावांचे लक्ष्य गाठले.
KKR vs RR: कोलकाता- राजस्थानमध्ये आज लढत
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील ३१ वा सामना खेळला जाणार आहे.