IPL 2024: केकेआरचे खेळाडूंसोबत घडलं असं काही; कोलकात्याला जाणारं विमान पोहोचलं वाराणसीला!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024: केकेआरचे खेळाडूंसोबत घडलं असं काही; कोलकात्याला जाणारं विमान पोहोचलं वाराणसीला!

IPL 2024: केकेआरचे खेळाडूंसोबत घडलं असं काही; कोलकात्याला जाणारं विमान पोहोचलं वाराणसीला!

May 07, 2024 08:29 PM IST

KKR Flight News: केकेआरच्या खेळाडूला कोलकात्याला घेऊन जाणारे विमान वाराणसीला पोहोचले.

केकेआरच्या संघाने यंदाच्या हंगामात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
केकेआरच्या संघाने यंदाच्या हंगामात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.

IPL 2024: आयपीएलमधील ५४व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स एकमेकांशी भिडले. या सामन्यात कोलकात्याच्या संघाने लखनौचा ९८ धावांनी पराभव केला. हा सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यानंतर केकेआरच्या खेळाडूंना कोलकाताला जायचे होते. पंरतु, खराब हवामानामुळे केकेआरचा संघ वाराणसी येथे पोहोचले. मात्र, आता केकेआरचा संघ कोलकात्याला पोहोचल्याची माहिती संघ व्यवस्थापनाने दिली.

कोलकात्याने मंगळवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार, केकेआरचा संघ सुरक्षित कोलकाताला पोहचला आहे. संघाने खेळाडूंचे काही फोटोही शेअर केले आहेत. खराब हवामानामुळे केकेआरचे खेळाडू कोलकात्यात उतरू शकले नाहीत. यामुळे कोलकात्याचा संघ गुवाहाटीहून बनारसला पोहोचला. याठिकाणी खेळाडूंनी बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर गंगा नदीत बोट राईडचा आनंद लुटण्यासाठी गेले. केकेआरने त्याचे फोटो शेअर केले आहेत.

Anshul Kamboj : मुंबई इंडियन्सनं दिलेल्या संधीचं सोनं करणारा अंशुल कंबोज आहे कोण? वाचा

केकेआरचे खेळाडू लखनौहून गुवाहाटीला पोहोचले. जिथून त्यांना कोलकात्याला जायचे होते. विमानाने टीम कोलकात्यात पोहोचली. मात्र, खराब हवामानामुळे विमान उतरू शकले नाही. या कारणास्तव विमान वळवून वाराणसीला पाठवण्यात आला. खेळाडूंनी येथील गंगा घाटाचा आनंद लुटला. मात्र, आता संपूर्ण टीम बनारसला पोहोचली. कोलकाताचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना ११ मे रोजी ईडन गार्डन्सवर होणार आहे.

IPL 2024 Orange Cap List: मुंबई- हैदराबाद सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत बदल, ट्रेव्हिस हेडनं केएल राहुलला मागं टाकलं

गुणतालिकेत कोलकात्याचा संघ अव्वल स्थानी

आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत कोलकात्याचा संघ अव्वल स्थानावर आहे. कोलकात्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ पैकी आठ सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकात्याचे सध्या १६ गुण आहेत. राजस्थान रॉयल्स यांचेही १६ गुण आहेत. परंतु, कोलकात्याचा रनरेट राजस्थानपेक्षा चांगला आहे.

कोलकात्याचा संघ:

फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा, मनीष पांडे, वैभव अरोरा, अंगकृष्ण रघुवनशी , रहमानउल्ला गुरबाज, श्रीकर भारत, मुजीब उर रहमान, अनुकुल रॉय, चेतन सक्रिया, शेरफान रदरफोर्ड, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसैन.

Whats_app_banner
विभाग