मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Hardik Pandya: गुजरात टायटन्सचा हिरो मुंबई इंडियन्ससाठी का ठरतोय झिरो; हैराण करणारं कारण समोर!

Hardik Pandya: गुजरात टायटन्सचा हिरो मुंबई इंडियन्ससाठी का ठरतोय झिरो; हैराण करणारं कारण समोर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 02, 2024 10:09 PM IST

Hardik Pandya Performance: हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

IPL 2024: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या हा जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आपल्या संघाला शेवटच्या क्षणी अनेक सामने जिंकून दिले आहेत. २०१५ ते २०२१ पर्यंत तो मुंबईच्या संघाचा महत्त्वाचा भाग होता. मुंबईकडून खेळताना त्याने ९५ सामन्यात १ हजार ५४५ धावा आणि ४३ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने त्याला आपल्या संघात सामील करून घेत त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर पदार्पणाच्या हंगामातच त्याने गुजरातच्या संघाला ट्रॉफी जिंकून दिली. त्यानंतर आयपीएल २०२३ मध्ये गुजरातला फायनलपर्यंत पोहोचवले. पंरतु, आयपीएल २०२४ मध्ये त्याचे मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पुनरागमन होताच त्याच्या कामगिरीचा आलेख खालच्या दिशेने जाऊ लागला.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला प्रथम गोलंदाजी न देण्याच्या निर्णयामुळे हार्दिक पांड्याला खूप ट्रोल केले जात आहे. हैदराबादचे फलंदाज मुंबई इंडियन्सच्या सर्व गोलंदाजांची धुलाई करत असताना हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहला १३ षटकांपैकी फक्त एकच षटक गोलंदाजी करायला दिली. इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही हार्दिकच्या कर्णधारपदावर टीका केली. गोलंदाजीत बुमराहचा योग्य वापर केला जात नाही. तर, हार्दिक पांड्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले पाहिजे.

RCB vs LSG Playing 11: बंगळुरू- लखनौच्या संघात प्रत्येकी एक-एक बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे मधल्या फळीचे फलंदाज अपयशी ठरत आहेत. नमन धीरने यंदा आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला आतापर्यंत ३ सामन्यांत केवळ ५० धावा करता आल्या. टिळक वर्माने हैदराबादविरुद्ध ६४ धावांची तुफानी खेळी केली. पण त्यानंतर त्याला आपल्या फलंदाजीत सातत्य ठेवण्यात आले नाही. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्स टीम डेव्हिड, हार्दिक पांड्या, नमन धीर आणि तिलक वर्मा यांच्या फलंदाजीच्या क्रमवारीत सातत्याने बदल करीत आहे.

IPL 2024 Schedule: आयपीएल २०२४ मधील दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, बीसीसीआयची घोषणा!

आयपीएलच्या गेल्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली शुभमन गिलने गुजरात टायटन्सशी टॉप ऑर्डरची जबाबदारी संभाळली होती. तर, मधल्या फळीत साई सुदर्शन, हार्दिक पंड्या आणि अगदी विजय शंकर यांनी अनेकदा चांगल्या खेळी केल्या. गेल्या हंगामातील गुजरातच्या बॅटिंग कॉम्बिनेशनच्या तुलनेत आयपीएल २०२४ मध्ये मुंबईचे बॅटिंग कॉम्बिनेशन फॉर्मच्या दृष्टीने खूपच कमकुवत दिसत आहे.

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला त्यांच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. डेथ ओव्हर्समध्ये खराब फलंदाजीमुळे मुंबईने हा सामना ६ धावांनी गमावला. त्यानंतर हैदराबादविरुद्ध त्यांना ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबईला त्यांच्या अखेरच्या सामन्यात राजस्थानकडून ६ विकट्सने पराभव पत्कारावा लागला.

WhatsApp channel