आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने याआधी पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल २०२४ चे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर करण्यात आले आहे.
आयपीएल २०२४ चा शेवटचा साखळी सामना १९ मे रोजी होणार आहे. तर आयपीएल २०२४ ची फायनल २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे.
BCCI ने यापूर्वी बोर्डाने ७ एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. आता पुढील सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल २०२४ मध्ये सहभागी सर्व १० संघ दोन गटात विभागले गेले आहेत.
अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आहेत, तर ब गटात चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स आहेत. दोन्ही गटातील सर्व संघांमध्ये प्रत्येकी एक सामना झाला आहे.
२१ मे पासून प्लेऑफचे सामने खेळवले जाणार आहेत. ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना १९ मे रोजी गुवाहाटी येथे होणार आहे.हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील असेल.
आयपीएल २०२४ चे प्लेऑफ सामने २१ मे पासून सुरू होणार आहेत. स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना २१ मे रोजी खेळवला जाईल, जो अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित होईल. यानंतर २२ मे रोजी एलिमिनेटर सामना होणार असून हा सामनाही अहमदाबादमध्ये होणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामातील दुसरा क्वालिफायर २४ मे रोजी खेळला जाईल, हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये आयोजित केला जाईल.