मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 Final Weather : आयपीएल फायनलदरम्यान पावसाची शक्यता किती? सामना झाला नाही तर हा संघ होईल चॅम्पियन

IPL 2024 Final Weather : आयपीएल फायनलदरम्यान पावसाची शक्यता किती? सामना झाला नाही तर हा संघ होईल चॅम्पियन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 26, 2024 12:20 PM IST

IPL 2024 Final Weather : सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायजर्स यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता किती आहे, हे जाणून घेऊया. पाऊस पडला तर सामन्याची मजा बिघडू शकते.

IPL 2024 Final Weather : आयपीएल फायनलदरम्यान पावसाची शक्यता किती? सामना झाला नाही तर हा संघ होईल चॅम्पियन
IPL 2024 Final Weather : आयपीएल फायनलदरम्यान पावसाची शक्यता किती? सामना झाला नाही तर हा संघ होईल चॅम्पियन

IPL Final 2024 Pitch Report : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज रविवारी (२६) होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. केकेआर आणि हैदराबादने या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. आता दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. पण सामन्याच्या एक दिवस आधी चेन्नईत पाऊस पडला होता. पण फायनलच्या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे.

पावसामुळे सामन्यावर परिणाम झाला तर त्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. जर सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि रद्द झाला तर तो राखीव दिवशी खेळवला जाऊ शकतो. आयपीएल २०२३ च्या फायनलमध्येही हे दिसून आले होते.  चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळला गेला.

सामना रद्द झाल्यास केकेआर विजेता ठरेल 

राखीव दिवशीही अंतिम सामना झाला नाही तर त्याचा फायदा केकेआरला मिळेल. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत कोलकाता अव्वल स्थानावर होता. नियमांनुसार, सामना न झाल्या गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल.

सुपर ओव्हरदेखील होऊ शकते 

पावसामुळे अंतिम सामन्यावर परिणाम झाला तर त्यासाठी सुपर ओव्हर होऊ शकते. राखीव दिवशी सुपर ओव्हरला वाव नसेल, तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ विजेता घोषित केला जाईल. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला याचा फायदा होऊ शकतो.

आयपीएल २०२४ फायनल चेपॉक पीच रिपोर्ट

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी सहसा गोलंदाजांसाठी फायदेशीर असते. क्वालिफायर-२ मध्ये राजस्थानविरुद्ध विजय मिळवल्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाला चेपॉक खेळपट्टीची चांगली समज असेल. चेपॉक खेळपट्टीवर नाणेफेक खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामाच्या अखेरीस या मैदानावर अनेक सामने खेळले गेले आहेत. यामुळे संथ झालेल्या खेळपट्टीवर धावा काढणे थोडे कठीण जाईल. गेल्या सामन्यातही फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती.

जर आपण सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआर यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोललो तर, आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण २७ सामने खेळले गेले, ज्यामध्ये केकेआर संघाने १८ सामने जिंकले, तर सनरायझर्स हैदराबादने ९ सामने जिंकले आहेत. 

टी-२० वर्ल्डकप २०२४