आयपीएल २०२४ च्या समारोपाची वेळ आली आहे. रविवारी (२६ मे) कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात अंतिम सामना होणार आहे. पॅट कमिन्सने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. पण, या पत्रकार परिषदेत धोनीच्या षटकाराने पॅट कमिन्सचे लक्ष विचलित केले.
वास्तविक, आयपीएल २०२४ च्या विजेतेपदाच्या लढाईत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. अवघ्या ५ दिवसांपूर्वी हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सकडून ८ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता, आता फायनलमध्ये त्यांचा सामना त्याच संघाशी होणार आहे.
क्वालिफायर वन सामन्यातील पराभवानंतर हैदराबादने शुक्रवारी (२४ मे) चेन्नई येथे झालेल्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, केकेआर आणि हैदराबाद यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी पॅट कमिन्स पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. पत्रकार परिषदेदरम्यान, टीव्हीवर हायलाईट्स सुरू होते. यात महेंद्रसिंह धोनी फलंदाजी करत होता. यावेळी धोनीचा षटकार टीव्हीवर दिसला. धोनीला षटकार मारताा पाहून पॅट कमिन्स काही क्षण टीव्हीकडे पाहत राहिला.
पॅट कमिन्सने टीव्हीकडे पाहत धोनीच्या षटकाराचा आनंद लुटला. यानंतर याच पत्रकार परिषदेत पॅट कमिन्सने एमएस धोनीचे कौतुक केले. याशिवाय कमिन्सने धोनीच्या कामगिरीबद्दलही सांगितले.