IPL Final 2024 Weather Report : फायनलपूर्वी चेपॉकमध्ये मुसळधार पाऊस, सामना झाला नाही तर चॅम्पियन कोण? नियम जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Final 2024 Weather Report : फायनलपूर्वी चेपॉकमध्ये मुसळधार पाऊस, सामना झाला नाही तर चॅम्पियन कोण? नियम जाणून घ्या

IPL Final 2024 Weather Report : फायनलपूर्वी चेपॉकमध्ये मुसळधार पाऊस, सामना झाला नाही तर चॅम्पियन कोण? नियम जाणून घ्या

May 25, 2024 07:34 PM IST

IPL Final 2024, KKR vs SRH : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना चेन्नईतील एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाईल. पण या सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली आहे.

IPL Final 2024 Weather Report : फायनलपूर्वी चेपॉकमध्ये मुसळधार पाऊस, सामना झाला नाही तर चॅम्पियन कोण? नियम जाणून घ्या
IPL Final 2024 Weather Report : फायनलपूर्वी चेपॉकमध्ये मुसळधार पाऊस, सामना झाला नाही तर चॅम्पियन कोण? नियम जाणून घ्या

IPL Final 2024 Weather Report :आयपीएल २०२४ चा अंतिम सामना रविवारी (२६ मे) चेन्नईच्या चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ विजेतेपदाच्या लढाईत आमनेसामने असतील. पण या सामन्यापूर्वी चेपॉकमधून चाहत्यांसाठी एक हृदयद्रावक चित्र समोर आले आहे.

वास्तविक, फायनलच्या एक दिवस आधी म्हणजे आज शनिवारी (२५ मे) चेन्नईत मुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत पावसामुळे सामना वाहून गेला, तर फायनलचा निर्णय कसा होईल, हे आपण येथे जाणून घेऊया.

चेपॉक स्टेडियमचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत, ज्यामध्ये पाऊस दिसत आहे. पावसामुळे केकेआरचे सराव सत्र रद्द करण्यात आले. या फोटोंशिवाय चेन्नईचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये मुसळधार पाऊस दिसत आहे.

सामन्यात पाऊस आला तर विजेता कसा ठरणार?

आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीतही पावसाने अडथळा आणला होता. पावसामुळे सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी पूर्ण झाला. पण यावेळी, म्हणजेच आयपीएल २०२४ च्या फायनलसाठी राखीव दिवस असेल की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

raining in chepauk chennai
raining in chepauk chennai

पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास सामना किमान ५ षटकांचा खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. ५ षटकांचाही सामना न झाल्यास सुपर ओव्हरद्वारे निर्णय घेतला जाऊ शकतो. पावसामुळे सुपर ओव्हर होऊ शकली नाही आणि राखीव दिवस ठेवला असेल किंवा राखीव दिवशीही सामना झाला नाही, तर पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाऊ शकते.

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. केकेआरने पहिला क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर हैदराबादने दुसरा क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. मागील हंगामात म्हणजेच २०२३ च्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले नव्हते.

Whats_app_banner