मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs KKR Live Streaming : फुकटात पाहायला मिळणार दिल्ली-कोलकाता यांच्यातील सामना? कुठे आणि कसा? वाचा

DC vs KKR Live Streaming : फुकटात पाहायला मिळणार दिल्ली-कोलकाता यांच्यातील सामना? कुठे आणि कसा? वाचा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 03, 2024 04:03 PM IST

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Streaming Details: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आयपीएलमधील सोळावा सामना खेळला जात आहे.

कोलकाता आणि दिल्ली यांच्यात आज विशाखापट्टणम सामना रंगणार आहे.
कोलकाता आणि दिल्ली यांच्यात आज विशाखापट्टणम सामना रंगणार आहे.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या सोळाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Delhi Capitals vs Kolkata Knight Riders) एकमेकांसमोर येणार आहेत. विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात दिल्लीचा संघ दुसऱ्या विजयाच्या शोधात मैदानात उतरणार आहे. तर, कोलकात्याला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दिल्ली आणि कोलकाता यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत ३२ सामने खेळले गेले आहेत. यापैकी दिल्लीने १५ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, कोलकाताने १६ सामने जिंकले आहेत. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरला आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

RCB vs LSG: डी कॉकच्या फटकेबाजीनंतर मयांक यादवची भेदक गोलंदाजी; लखनौचा २८ धावांनी विजय, बंगळुरूचा तिसरा पराभव!

कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवारी (०३ एप्रिल २०२४) आयपीएलमधील १६वा सामना खेळला जाईल. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. व्हाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए- व्हीडीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com/ वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

IPL 2024: क्विंटन डी कॉकची ऐतिहासिक कामगिरी, आयपीएलमध्ये गाठला महत्त्वाचा टप्पा, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी

आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता दुसऱ्या आणि दिल्लीचा संघ सातव्या स्थानावर आहे. कोलकात्याने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकात्याने त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे हैदराबाद आणि बंगळुरूचा पराभव केला. कोलकात्याचे चार गुण असून त्यांचा निव्वळ रनरेट सध्या +१.०४७ इतका आहे.

दुसरीकडे दिल्लीच्या संघाने त्यांच्या पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर चेन्नईविरुद्ध सामन्यात विजयाचे खाते उघडले.दिल्लीला त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.परंतु, रविवारी खेळल्या गेलेल्या चेन्नई विरुद्ध सामन्यात दिल्लीने २० धावांनी विजय मिळवत पुनरागमन केले आहे. दिल्लीच्या खात्यात सध्या दोन गुण आहेत आणि त्यांचा निव्वळ रनरेट -०.०१६ इतका आहे.

IPL_Entry_Point