CSK vs RCB Playing XI : आरसीबीची प्रथम फलंदाजी, सीएसकेकडून समीर-रचिनचे पदार्पण, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs RCB Playing XI : आरसीबीची प्रथम फलंदाजी, सीएसकेकडून समीर-रचिनचे पदार्पण, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन

CSK vs RCB Playing XI : आरसीबीची प्रथम फलंदाजी, सीएसकेकडून समीर-रचिनचे पदार्पण, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन

Published Mar 22, 2024 07:59 PM IST

CSK vs RCB Toss And Playing XI : आयपीएल २०२४ चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आहे. उभय संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम खेळला जात आहे.

CSK vs RCB Playing XI : आरसीबीची प्रथम फलंदाजी, सीएसकेकडून समीर-रचिनचे पदार्पण, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन
CSK vs RCB Playing XI : आरसीबीची प्रथम फलंदाजी, सीएसकेकडून समीर-रचिनचे पदार्पण, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन (CSK Twitter)

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) यंदाच्या सीझनचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात  होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच CSK संघ या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणार आहे.

CSK च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मथिशा पाथिराना आणि मुस्तफिजुर रहमान या ४ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. रचिन रवींद्र आणि समीर रिझवी हे आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. 

तर दुसरीकडे, फॅफ डू प्लेसिस, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ आणि ग्लेन मॅक्सवेल हे आरसीबीच्या प्लेइंग-इलेव्हनमधील ४ परदेशी खेळाडू आहेत.

अल्झारी जोसेफ आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन बेंगळुरूसाठी पदार्पण करत आहेत. 

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महीश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.

सामन्याआधी रंगला उद्घाटन सोहळा 

आयपीएल २०२४ च्या उद्घाटन सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटन सोहळ्यात सर्वप्रथम अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी दमदार परफॉर्मन्स केला. अक्षय कुमारने भूलभुलैया आणि देसी बॉईज सारख्या हिट चित्रपटातील गाण्यांवर परफॉर्म केले. त्यानंतर मोहित चौहान, एआर रहमान आणि सोनू निगम यांनीही आपल्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या