CSK vs RCB : आयपीएल स्पर्धेत असा चमत्कार पहिल्यांदाच घडला! काय झालं वाचा!-ipl 2024 csk vs rcb match 1 create history highest aggregate in an ipl game with no individual 50 plus score ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs RCB : आयपीएल स्पर्धेत असा चमत्कार पहिल्यांदाच घडला! काय झालं वाचा!

CSK vs RCB : आयपीएल स्पर्धेत असा चमत्कार पहिल्यांदाच घडला! काय झालं वाचा!

Mar 23, 2024 10:55 AM IST

CSK vs RCB Match new record : सीएसके व आरसीबीमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२४ च्या पहिल्याच सामन्यात एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे.

आयपीएल स्पर्धेत असा चमत्कार पहिल्यांदाच घडला! काय झालं वाचा!
आयपीएल स्पर्धेत असा चमत्कार पहिल्यांदाच घडला! काय झालं वाचा!

CSK vs RCB IPL 2024 : आयपीएल २०२४ स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानं आणि एका ऐतिहासिक विक्रमानं झाली आहे. सीएसके आणि आरसीबीमध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ३४९ धावा केल्या. एकाही खेळाडूनं अर्धशतक न मारता उभारली गेलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.

यापूर्वी हा विक्रम गुजरात लायन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंटच्या नावावर होता. २०१७ मध्ये या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात एकूण ३४३ धावा झाल्या होत्या. मात्र, त्यावेळी एकाही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा गाठता आला नव्हता. आता ६ वर्षांनंतर CSK विरुद्ध RCB सामन्यात हा विक्रम मोडला गेला आहे. महेंद्रसिंग धोनी या दोन्ही सामन्यांचा भाग होता हा योगायोग आहे.

एकाही खेळाडूनं अर्धशतक न ठोकता झालेली सर्वोच्च धावसंख्या

३४९ - CSK विरुद्ध RCB, चेन्नई, २०२४

३४३ - GL विरुद्ध RPS, राजकोट, २०१७

३४३ - KKR विरुद्ध CSK, अबू धाबी, २०२१

३४२ - पीबीकेएस वि आरआर, मोहाली, २०१४

३३७ - SRH विरुद्ध KKR, हैदराबाद, २०२३

कसा झाला पहिला सामना?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं २० षटकांत ६ गडी गमावून १७३ धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिस (३५) सोबत विराट कोहली (२१) यांनी संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. पण डु प्लेसिस बाद झाल्यानंतर आरसीबीला रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेलच्या रूपानं लागोपाठ दोन धक्के बसले. दोन्ही खेळाडू खातं न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर आलेल्या नवोदित अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. रावतनं ४८ तर कार्तिकनं ३८ धावा केल्या.

१७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या CSK संघाची सुरुवात चांगली झाली. आयपीएल पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्रनं १५ चेंडूत ३७ धावा केल्या, तर कर्णधार रुतुराज गायकवाडनं १५ धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणेनं २७ धावांची आणि डॅरिल मिशेलनं २२ धावांची छोटी, पण प्रभावी खेळी खेळली. शेवटी दुबे आणि जडेजा या जोडीनं धम्माल उडवून दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६६ धावांची नाबाद भागीदारी करून सीएसकेला विजयापर्यंत नेलं. जडेजा २५ तर दुबे ३४ धावांवर नाबाद राहिला.

विभाग