IPL 2024: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्जला तगडा झटका लागला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईचा संघ शुक्रवारी त्यांचा चौथा सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी संघातील महत्त्वाचा खेळाडू मुस्तफिजुर रहमान अचानक घरी परतला आहे. व्हिसा संबंधित कारणांमुळे चेन्नईचा स्टार गोलंदाज मायदेशी परतला असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर चेन्नईला तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई त्यांचा पुढचा सामना हैदराबाद सोबत खेळणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेन्नईचा आघाडीचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान बांगलादेशला परतला आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी व्हिसाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी तो मायदेशी परतल्याचे सांगितले जात आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी सांगितले की, "मुस्तफिजूर काल रात्री आयपीएलमधून आगामी टी-२० विश्वचषकासाठी यूएस व्हिसासाठी आला आहे.
आयपीएल २०२४ च्या पर्पल कॅपच्या शर्यतीत मुस्तफिझूर रहमान चमकदार कामगिरी केली. त्याने चेन्नईसाठी तीन सामन्यांत महत्त्वाची भूमिका बजावली. मुस्तफिझूर रहमान आतापर्यंत सात विकेट्स घेतल्या होत्या.सध्या पर्पल कॅप त्याच्याकडे आहे. मात्र, दिल्लीविरुद्ध सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याने चार षटकात ४७ धावा दिल्या.
बीसीबीने अहवालात पुढे म्हटले आहे की, मुस्तफिजूर रहमान एप्रिलच्या अखेरपर्यंत आयपीएल २०२४ मध्ये खेळताना दिसणार आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज झिम्बाब्वेविरुद्ध ३ मेपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. मुस्तफीजुर रेहमान ९१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १०७ विकेट घेतल्या आहेत.
रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, महेश थेक्षाना, मोईन अली, अजय जाधव मंडल, प्रशांत सोलंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, हंगरगेकर, अरावेली अवनीश.