मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs GT : गुजरातच्या गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी, ट्रेव्हिस हेड-क्लासेनच्या हैदराबादला १६२ धावांवर रोखलं

SRH vs GT : गुजरातच्या गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी, ट्रेव्हिस हेड-क्लासेनच्या हैदराबादला १६२ धावांवर रोखलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 31, 2024 05:13 PM IST

SRH vs GT IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये आज गुजरात आणि हैदराबाद आमनेसामने आहेत. या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

IPL 2024 Scorecard SRH vs GT गुजरातच्या गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी, ट्रेव्हिस हेड-क्लासेनच्या हैदराबादला १६२ धावांवर रोखलं
IPL 2024 Scorecard SRH vs GT गुजरातच्या गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी, ट्रेव्हिस हेड-क्लासेनच्या हैदराबादला १६२ धावांवर रोखलं (AP)

ipL 2024 SRH vs GT Today match Scorecard : आयपीएल २०२४ चा १२ वा सामना आज (३१ मार्च) गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हैदराबादने निर्धारित २० षटकात ८ बाद १६२ धावा केल्या आहेत.

यानंतर आता गुजरात टायटन्सला विजयासाठी १६३ धावा करायच्या आहेत. हैदराबादकडून अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी २९-२९ धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक ३ बळी घेतले.

या सामन्यात हैदराबादचे स्टार फलंदाज कमाल दाखवू शकले नाहीत. मात्र अब्दुल समद आणि शाहबाज अहमद यांनी सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादने पहिल्या ४ षटकांत चांगली सुरुवात केली होती आणि वेगाने धावा केल्या होत्या. परंतु पहिली विकेट पडल्यानंतर धावांचा वेग कमी झाला. हैदराबादने १५ व्या षटकात केवळ ११४ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. 

त्यानंतर समद आणि शाहबाज यांनी सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. यामुळे हैदराबाद १७० धावा ओलांडणार असे वाटत असतानाच अखेरच्या षटकात पुन्हा गुजरातच्या गोलंदाजांनी डाव उलटवला. मोहित शर्माने शेवटच्या षटकात केवळ ३ धावा देत ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर एक फलंदाज धावबाद झाला.

शाहबाज अहमदने २० चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह २२ धावा केल्या. तर अब्दुल समदने अवघ्या १४ चेंडूत २९ धावांची खेळी केली. समदने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. 

मयंक अग्रवाल १७ चेंडूत १६ धावा करून बाद झाला, ट्रॅव्हिस हेड १४ चेंडूत १९ धावा करून बाद झाला आणि एडन मार्कराम १९ चेंडूत १७ धावा केल्या.

हेन्रिक क्लासेनने नूर अहमदला लागोपाठ दोन षटकार ठोकले, पण त्यानंतर रशीद खानने क्लासेनला बाद केले. क्लासेन १३ चेंडूत २४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. क्लासेनच्या बॅटमधून १ चौकार आणि २ षटकार आले.

खेळपट्टी खूपच संथ दिसत आहे. विशेष म्हणजे हैदराबादकडे आज वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद आणि मयंक मार्कंडे यांच्या रूपाने तीन फिरकीपटू आहेत. अशा स्थितीत सामना रोमांचक होऊ शकतो.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान शाह (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, दर्शन नळकांडे, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.

सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.

IPL_Entry_Point