इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. या मोसमातील पहिला सामना महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दोन्ही संघ या महामुकाबल्यासाठी तयार आहेत. या ठिकाणी आपण धोनीची चेन्नई सुपर किंग्स यंदाच्या आयपीएलसाठी किती तयार आहे आणि संघ किती मजबूत आहे, ते पाहणार आहोत.
चेन्नई सुपर किंग्सने गेल्या मोसमाच्या म्हणजेच, IPL २०२३ च्या फायनलमध्ये गुजरातला हरवून विजेतेपदावर कब्जा केला होता. सीएसके ५ वेळा चॅम्पियन ठरला आहे. मात्र यावेळी त्यांचा मार्ग सोपा नसेल. संघाचा अनुभवी खेळाडू डेव्हॉन कॉनवे जखमी झाला आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही. विशेष म्हणजे, सीएसकेकडे फार मोठ्या स्टार खेळाडूंची फौज नाही.
चेन्नई सुपर किंग्जच्या बॅटिंग लाइन अपवर नजर टाकली तर त्यात अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड हे मोठे खेळाडू आहेत. अनुभवी खेळाडू कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या कारणामुळे तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. समीर रिझवीवर संघाने मोठी रक्कमी लावून त्याला संघात घेतले आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये समीरचा रेकॉर्ड चांगला आहे. समीरने ९ टी-20 सामन्यात २९५ धावा केल्या आहेत. यात त्याने २ अर्धशतकेही झळकावली आहेत.
रवींद्र जडेजा आणि मोईन अली संघासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहेत. शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबेनेही अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. हे खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतात. मिचेल सँटनर आणि निशांत संधू यांनीही चांगली कामगिरी केली आहे.
जडेजा हा संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये २२५ सामने खेळले आहेत. यात त्याने २६९२ धावा केल्या आहेत. त्याने १५२ विकेट्सही घेतल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजीवर नजर टाकली तर दीपक चहर व्यतिरिक्त कोणीही अनुभवी नाही. चहरने आतापर्यंत ७३ आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने ७२ विकेट घेतल्या आहेत. तसेच, सीएसकेकडे महिष थीक्षाना आणि राज्यवर्धन हंगरगेकरसारखे गोलंदाजीचे चांगले पर्याय आहेत. पण या खेळाडूंना फारसा अनुभव नाही. मथीषा पाथिराना आणि महिष थीक्षणा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतात.
न्यूझीलंडचे रचिन रविंद्र आणि डॅरिल मिशेल यांच्यावर चेन्नईन भरपूर पैसे खर्च केले. चेन्नईने मिशेलला १४ कोटींना खरेदी केले. तर रचिन रवींद्रला १.८० कोटींना विकत घेतले. रचिनने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्याने २० टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २१४ धावा केल्या आहेत.
यासोबतच ११ विकेट्सही घेतल्या आहेत. रवींद्रची एकूण कामगिरी चांगली आहे. मिशेलबद्दल बोलायचे झाले तर त्याने ६३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२६० धावा केल्या आहेत. त्याने ८ विकेट्सही घेतल्या आहेत. हे दोन्ही खेळाडू यावेळी सीएसकेसाठी चांगली कामगिरी करू शकतात.
चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संग - एमएस धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महिष थीक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रहमान, अवनीश राव अरावली.