मराठी बातम्या  /  बिझनेस  /  iPhone: आयफोनच्या खरेदीवर मिळतेय मोठी सूट, फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर!

iPhone: आयफोनच्या खरेदीवर मिळतेय मोठी सूट, फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 27, 2024 12:11 AM IST

iPhone 14 and iPhone 14 Plus Offers: फ्लिपकार्टवर आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लसच्या किंमतीवर मोठी सूट दिली जात आहे.

The iPhone 14 price drop is now live on Flipkart. Check details.
The iPhone 14 price drop is now live on Flipkart. Check details. (HT Tech)

iPhone Offers: होळीच्या सणानिमित्त ई- कॉमर्स बेवसाईट फ्लिपकार्टवर स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या खरेदीवर भरघोस सूट दिली जात आहे.  या ऑफर अंतर्गत ग्राहकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. फ्लिपकार्टवर आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट दिली जात आहे. हे दोन्ही स्मार्टफोन आयफोन १४ लाइनअपचा भाग म्हणून गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते.

आयफोन १४  च्या १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टने आयफोन १४ च्या किंमतीत १८ टक्क्यांची घसरण केली आहे. यामुळे हा फोन ग्राहकांना अवघ्या ५६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

आयफोन १४ प्लस देखील १६ टक्के कपातीसह उपलब्ध आहे. आयफोन १४ प्लसची मूळ किंमत ७९ हजार ९०० रुपये इतकी आहे. परंतु, फ्लिपकार्ट ऑफरअंतर्गत ग्राहकांना हा फोन ६६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या दोन्ही स्मार्टफोनच्या इतर स्टोरेज व्हेरियंटवरही ऑफर देत आहे.

याशिवाय, ग्राहक एक्स्चेंजऑफर्सचा ही लाभ घेऊ शकतात. आयफोन १४ वर आपल्या जुन्या स्मार्टफोनमध्ये एक्स्चेंज केल्यास ग्राहकांना ४८ हजारांपर्यंत सूट मिळत आहे. आयफोन १४ प्लसवर ५० हजार रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

एचएसबीसी बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १ हजार ५०० रुपयांपर्यंत १० टक्के सूटसह बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. याचबरोबर ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग