Tadoba Tiger Reserve: संपूर्ण जगात आज आंतराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करणे आणि त्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करणे हा एक जागतिक उपक्रम आहे. हा दिवस वाघाशी संबंधित माहितीमध्ये रस वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. या दिनानिमित्त भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ताडोबा जंगलात सफारीचा आनंद घेतानाचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत त्याने वाघाचे भविष्य आपल्यावर अवलंबून असून ही सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, २०१८ ते २०२२ पर्यंत भारतातील वाघांच्या संख्येत सुमारे २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. देशात सध्या ३ हजार ६८२ वाघ आहेत. देशात सर्वाधिक ७८५ वाघ मध्य प्रदेशात आहेत. यानंतर कर्नाटक राज्यात ५६३ वाघ आहेत. उत्तराखंड आणि महाराष्ट्रात अनुक्रमे ५६० आणि ४४४ वाघ आहेत. १९७३ मध्ये राबविण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पाने वन्यजीवांच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली. जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत. शेवटची आकडेवारी २०२२ मध्ये जाहीर करण्यात आली होती.
ताडोब्यात जंगल सफारीचा आनंद घेतल्यानंतर सचिन म्हणाला की, ‘ताडोबात मला वाघाच्या तीन पिढ्या पाहण्याची संधी मिळाली. जुनाबाई, तिचे शावक वीरा आणि वीराचे पिल्ले पाहायला मिळाले. हा एक अद्भुत अनुभव आहे. जुनाबाईंच्या नातवंडांना पाहून खूप आनंद झाला. तिथे दोन्ही वाघ आणि मी त्यांची आईही पाहिली. निसर्गाची लवचिकता काय साध्य करू शकते? याचे हे एक सुंदर उदाहरण आहे. वाघाचे भविष्य आपल्यावर अवलंबून आहे आणि ही सामूहिक जबाबदारी देखील आहे.’
सचिन तेंडुलकरचा हा व्हिडिओ जुना आहे. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सचिन तेंडुलकरने ताडोब्यात जंगल सफारी केली होती. त्यावेळी त्यांनी वाघाच्या तीन पिढ्या पाहिल्या. सचिन तेंडुलकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक्स केले आहे, ज्यात अनेक सेलिब्रेटींचाही समावेश आहे.
सचिन तेंडुलकरचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी आनंद केला. हे खूप सुंदर आहे, असे एका युजरने म्हटले आहे. तर, आपण वन्यजीवांचा आनंद घेत आहात हे पाहून खूप छान वाटले, असे दुसऱ्या युजने म्हटले. एका जणाने सचिन तेंडुलकरच्या या व्हिडिओवर क्रिकेटचा बादशाह अशी कमेंट केली. अनेकांनी हार्ट किंवा फायर इमोटिकॉनचा वापर करून व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या.