मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Hardik Pandya : एखाद्या राजवाड्यालाही लाजवेल असं आहे हार्दिक पांड्याचं हे आलिशान घर, सुविधा पाहून चक्रावून जाल!

Hardik Pandya : एखाद्या राजवाड्यालाही लाजवेल असं आहे हार्दिक पांड्याचं हे आलिशान घर, सुविधा पाहून चक्रावून जाल!

May 29, 2024 01:29 PM IST

Hardik Pandya Luxurious House: हार्दिक पांड्याच्या गुजरात येथील अलिशान घराची सर्वत्र चर्चा रंगली. ६ हजार स्क्वेअर फुटांचे हे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.

हार्दिक पांड्याचे गुजरात येथील घराची किंमत ३.५ कोटी इतकी आहे.
हार्दिक पांड्याचे गुजरात येथील घराची किंमत ३.५ कोटी इतकी आहे.

Hardik Pandya Latest News: हार्दिक पांड्या हा भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. हार्दिक हा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ए ग्रेडचा खेळाडू आहे. त्याला वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात. त्याच्याकडे उत्पन्नाचे इतरही अनेक स्त्रोत आहेत. हार्दिकचे गुजरातमधील वडोदरा येथे ६ हजार स्क्वेअर फुटांचे आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे ३.५ कोटी रुपये आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हार्दिक पांड्याचे घर प्रसिद्ध वास्तुविशारद अनुराधा अग्रवाल यांनी डिझाइन केले आहे. अनुराधा अग्रवाल यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकच्या घरातील प्रत्येक खोली त्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीनुसार तयार करण्यात आली. या आलिशान घरामध्ये व्यायामशाळा, होम थिएटर आणि स्टायलिश डिझाइन केलेली बाल्कनी देखील आहे.

हार्दिक पांड्याची खोली कशी आहे?

हार्दिक पांड्याची खोली कोणत्याही क्रिकेटप्रेमीचे मन जिंकेल. खोलीत हार्दिकसह इतर क्रिकेटपटूंचा मोठा फोटो आहे. याशिवाय, त्याच्या खोलीत निळ्या रंगाच्या मऊ शेड्स ​​आहेत. हार्दिकच्या खोलीत खोलीत फारच कमी सजावट आहे. याला विविध प्रकारच्या टेक्सचरचा लुक देण्यात आला आहे. या खोलीत प्रवेश करताच थकवा दूर होऊन आराम मिळतो.

क्रुणालच्या खोलीला स्टुडिओचा लूक

कृणाल पांड्याच्या खोलीला पिवळा रंग देण्यात आला आहे. त्याच्या बेडच्या समोर एक मोठा टीव्ही आहे. टीव्हीच्या उजव्या बाजूला तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे पडदे टांगलेले आहेत. पलंगाच्या मागील भिंतीवर सात घोड्यांचे चित्र आहे, जे घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचे प्रतीक मानले जाते. क्रुणालच्या खोलीत प्रवेश करताच एखाद्या स्टुडिओमध्ये आल्यासारखे वाटेल.

मुंबईच्या वांद्रे परिसरात ३० कोटींचे घर

गुजरात व्यतिरिक्त पांड्या बंधूंचे मुंबईच्या वांद्रे परिसरात देखील घर आहे, ज्याची किंमत ३० कोटी आहे. हे घर रुस्तमजी पॅरामाउंट कॉम्प्लेक्समध्ये आहे. या घरामध्ये जिम, रॉक क्लाइंबिंग, स्पा, गेम रूम आणि स्काय लाउंजचीही सुविधा आहे. संपूर्ण मुंबई शहराचे चित्तथरारक दृश्यही या घरातून पाहू शकतो.

टी-२० वर्ल्डकप २०२४