मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  INDW vs AUSW: भारत- ऑस्ट्रेलियात आज निर्णायक सामना; टी-२० मालिकेवर नाव कोरण्यासाठी एकमेकांशी भिडणार!

INDW vs AUSW: भारत- ऑस्ट्रेलियात आज निर्णायक सामना; टी-२० मालिकेवर नाव कोरण्यासाठी एकमेकांशी भिडणार!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 09, 2024 09:55 AM IST

India Womens and Australia Womens 3rd T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा आणि तिसरा सामना खेळला जाणार आहे.

INDW vs AUSW T20 Series
INDW vs AUSW T20 Series

INDW vs AUSW T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात आज (९ जानेवारी २०२३) तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी तीन सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येकी १-१ सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौऱ्यातील हा शेवटचा सामना असेल. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ आपल्या मायदेशात परतेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवला होता. तर, एकदिवसीय मालिकेत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. आज टी-२० मालिकेतील निर्णायक सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल, यावर एक नजर टाकुयात.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात कोणताही बदल केले जाण्याची शक्यता फार कमी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने खराब फिल्डिंग केली. परिणामी, भारताला पराभव स्वीकारावा लागला. अशातच भारतासमोर मालिका जिंकण्याचे आव्हान असेल. या सामन्यात भारतीय फलंदाजांना संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जावे लागणार आहे.

भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने गेल्या पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताला ३-० अशा फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर टी-२० मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले. अखेरच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघातही काही बदल केला जाणार नाही, अशी अपेक्षा आहे.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा पॉश (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

एलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, किम गर्थ, मेगन शूट.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi