IND-W vs SA-W T20 Series : भारतीय महिला संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे, कारण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेशमध्ये महिला टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे.
या दरम्यान, आता टीम इंडियाच्या आणखी एका मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे. टीम इंडिया जून आणि जुलैमध्ये १ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ टी-20 सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचे यजमानपद भूषवणार आहे.
याबाबत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (KSCA) एका अधिकाऱ्याने सांगितले की, एकदिवसीय आणि T20 सामने बेंगळुरूमध्ये खेळवले जातील, तर कसोटी सामना चेन्नईमध्ये खेळवला जाईल. एकदिवसीय सामने १६ जूनपासून एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू होतील, तर एकमेव कसोटी सामना २८ जूनपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू होईल.
यानंतर टीम इंडिया आणि आफ्रिका संघ ५, ७ आणि ९ जुलै रोजी टी-२० मालिकेसाठी बंगळुरूला परततील.
भारत आणि आफ्रिका यांच्यातील टी-20 आणि वनडे मालिका गेल्या वर्षाच्या अखेरीस खेळवली जाणार होती, परंतु गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान भारतात झालेल्या ५० षटकांच्या ICC पुरुष विश्वचषकामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
आता मर्यादित षटकांच्या मालिकेत कसोटी सामन्याचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) पारंपारिक स्वरूपात महिला क्रिकेटला अधिक प्रोत्साहन देऊ इच्छित आहे.
विशेष म्हणजे, भारताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी १ कसोटी खेळली होती. त्या सामन्यांमध्ये भारताने इंग्लंडचा ३४७ धावांनी आणि ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला होता.
संबंधित बातम्या