महिला टी-20 विश्वचषक २०२४ आज (३ ऑक्टोबर) सुरू होत आहे. १८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १० संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघ विजेतेपदाचा बचाव करण्याचा प्रयत्न करेल, तर भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल.
हा ९वा टी-20 वर्ल्डकप आहे. टीम इंडिया आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ८ वर्ल्डकपमध्ये जेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचली आहे, पण त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही.
महिला टी-20 विश्वचषकाची सुरुवात २००९ मध्ये झाली पहिल्याच वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. पण त्यावेळी भारताचा विजयी रथ न्यूझीलंडने रोखला. महिला टी-२० विश्वचषक २०१० मध्येही भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. येथे ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतीय संघाचा पराभव केला.
२०१२, २०१४ आणि २०१६ च्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला ग्रुप स्टेजच्या पुढे प्रगती करता आली नाही.
यानंतर भारतीय महिलांनी पुन्हा एकदा महिला T20 विश्वचषक २०१८ मध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारतीय महिला संघाचा ८ गडी राखून पराभव केला.
महिला टी-20 विश्वचषक २०२० मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव केला. महिला टी-२० विश्वचषक २०२३ मध्येही भारतीय महिलांनी उपांत्य फेरी गाठली. मात्र, येथेही त्यांना ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव पत्करावा लागला.
२००९ : इंग्लंड महिला संघ
२०१० : ऑस्ट्रेलिया महिला संघ
२०१२ : ऑस्ट्रेलिया महिला संघ
२०१४ : ऑस्ट्रेलिया महिला संघ
२०१६ : वेस्ट इंडिज महिला संघ
२०१८ : ऑस्ट्रेलिया महिला संघ
२०२० : ऑस्ट्रेलिया महिला संघ
२०२३ : ऑस्ट्रेलिया महिला संघ
२००९ : उपांत्य फेरी
२०१० : उपांत्य फेरी
२०१२ : गट टप्पा
२०१४ : गट टप्पा
२०१६ : गट टप्पा
२०१८ : उपांत्य फेरी
२०२० : उपविजेता
२०२३ : उपांत्य फेरी
संबंधित बातम्या