INDW vs WIW Harmanpreet Kaur Catch Video : वेस्ट इंडिजचा महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत महिला आणि वेस्ट इंडिज महिला यांच्यातील टी-20 मालिका संपल्यानंतर आजपासून (२२ डिसेंबर) वनडे मालिकेला सुरुवात झाली.
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे खेळला गेला, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरने एका शानदार घेतला. या झेलचा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. कर्णधार हरमनप्रीतने उंच उडी घेत एका हाताने अप्रतिम झेल घेत वेस्ट इंडिजच्या आलिया ॲलिनला बाद केले.
हरमनप्रीतने उत्कृष्ट टायमिंगसह उडी मारली आणि चेंडू तिच्या हातात अडकला. हा झेल घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा थरारवेस्ट इंडिजच्या डावातील ११ व्या षटकात घडला, जेव्हा रेणुका सिंग गोलंदाजी करत होती. रेणुकाच्य चेंडूवर आलिया ॲलिनने लाँग-ऑनच्या दिशेने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, यात बॅट आणि बॉलचे कनेक्शनही चांगले झाले, पण हरमनप्रीत सीमारेषा आणि चेंडूच्या आत आली आणि तिने अप्रतिम झेल पकडला. तिने जबरदस्त उडी मारली आणि उजव्या हातात झेल घेतला. अलिना बाद झाल्यामुळे अवघ्या २६ धावांवर वेस्ट इंडिजची पाचवी विकेट गेली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटचे दोन सामने हरमनप्रीत कौरला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. पण तिने आज वनडे सामन्यातून संघात पुनरागमन केले आणि २३ चेंडूत ३४ धावा केल्या. यादरम्यान तिने ३ चौकार आणि १ षटकारही लगावला. भारताने पहिला वनडे सामना २११ धावांनी जिंकला.
भारताकडून फलंदाजीत स्मृती मंधानाने ९१ धावांचे योगदान दिले, तर रेणुका ठाकूरने गोलंदाजीत ५ बळी घेत भारताला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याआधी भारतीय संघाने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा २-१ असा पराभव केला होता.
संबंधित बातम्या