द्रविड ते पारस म्हांब्रे… भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा कोचिंग स्टाफ सध्या काय करतोय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  द्रविड ते पारस म्हांब्रे… भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा कोचिंग स्टाफ सध्या काय करतोय? जाणून घ्या

द्रविड ते पारस म्हांब्रे… भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा कोचिंग स्टाफ सध्या काय करतोय? जाणून घ्या

Oct 14, 2024 05:00 PM IST

Team India Coaching Staffs : टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड आणि त्याच्या कोचिंग स्टाफने जल्लोषात निरोप घेतला. नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने आपला नवा कोचिंग स्टाफ तयार केला आहे.

द्रविड ते पारस म्हांबरे… भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा कोचिंग स्टाफ सध्या काय करतोय? जाणून घ्या
द्रविड ते पारस म्हांबरे… भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा कोचिंग स्टाफ सध्या काय करतोय? जाणून घ्या (REUTERS)

टी-20 विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर BCCI ने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड याचा उत्तराधिकारी नेमला. टीम इंडियाच्या कोचपदी गौतम गंभीरची निवड करण्यात आली. तर राहुल द्रविड आता आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे, परंतु त्याच्या कोचिंग स्टाफचे इतर सदस्य कुठे आहेत आणि ते काय करत आहेत?

टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड आणि त्याच्या कोचिंग स्टाफने जल्लोषात निरोप घेतला. नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने आपला नवा कोचिंग स्टाफ तयार केला आहे. अशा परिस्थितीत राहुल द्रविड आणि त्याचे सहकारी सध्या कुठे आहेत आणि टीम इंडिया सोडल्यानंतर काय करत आहेत, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

राहुल द्रविड - आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक

विक्रम राठौर- आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचे फलंदाजी प्रशिक्षक

पारस म्हांब्रे- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक

टी दिलीप- सध्या टीम इंडियासोबतच फिल्डींग कोच.

द्रविड, राठोड राजस्थान रॉयल्ससोबत

टीम इंडियामधील आपला यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राहुल द्रविडला अनेक आयपीएल संघांकडून ऑफर आल्या होत्या, परंतु द्रविडने त्याच्या जुन्या फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले.

द्रविडने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवले असून निवृत्तीनंतर तो प्रशिक्षक म्हणूनगही काम केले होते. द्रविडने राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांना त्याच्या कोचिंग स्टाफमधील महत्त्वाचा सदस्य बनवले आहे.

पारस म्हांबरे मुंबई इंडियन्समध्ये 

२०२१ मध्ये भरत अरुण यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ५२ वर्षीय पारस म्हाब्रे यांना भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले. राहुल द्रविड आणि विक्रम राठोड यांच्याप्रमाणे पारस म्हांबरे देखील राजस्थान रॉयल्सचा भाग होतील अशी अपेक्षा होती, पण आता अशी बातमी आहे की ते मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार आहेत. भारतासाठी २ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळलेले पारस म्हांबरे, पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्समध्ये लसिथ मलिंगासोबत काम करणार आहेत

 टी दिलीप टीम इंडियासोबतच

गौतम गंभीरच्या नवीन कोचिंग स्टाफमध्ये राहुल द्रविडच्या जुन्या कोचिंग स्टाफमधील कोणी सदस्य कायम राहिला असेल तर तो टी दिलीप आहे. ड्रेसिंग रूममध्ये आपल्या भाषणाने सर्वांना आकर्षित करणाऱ्या दिलीपने सामन्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्काराची परंपरा सुरू केली.

संघ व्यवस्थापनापासून ते बोर्डापर्यंत सर्वजण त्याच्या मेहनतीने प्रभावित झाले. संघाचे सुधारलेले क्षेत्ररक्षण हे त्याच्या कामाचे बक्षीस आहे. राज्य क्रिकेट अकादमीच्या ज्युनियर वयोगटातील खेळाडूंना ट्रेनिंग दिल्यानंतर टी दिलीप आयपीएल संघ डेक्कन चार्जर्स हैदराबादचे सहाय्यक क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले आणि त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये एक दशक घालवले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या