Mohammed Shami On Arjuna Award: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने अर्जुन पुरस्कारावर मोठे वक्तव्य केले. लोक आपले संपूर्ण आयुष्य घालवतात. परंतु, हा पुरस्कार जिंकू शकत नाहीत. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. अर्जुन पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस झाली, याचा मला आनंद आहे, असे मोहम्मद शामी म्हणाला.
भारताचे राष्ट्रपती आज (९ जानेवारी २०२३) मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करतील. केंद्र सरकारने २० डिसेंबर २०२३ला क्रिडा पुरस्काराची यादी जाहीर करण्यात आली. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. मोहम्मद शामी व्यतिरिक्त २६ खेळाडूंना विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत मोहम्मद शामीने जबरदस्त गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत मोहम्मद शामीने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. शामीने अवघ्या ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद शमीच्या शानदार कामगिरीमुळे टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली. मात्र, ऑस्ट्रेलि विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन), रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)
ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), श्रीशंकर एम (अॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाला (अश्वस्वार), दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कब्बडी), रितू नेगी (कब्बडी), नसरीन (खो-खो), सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स), ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग), सुश्री ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), सुश्री अँटिम (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट),प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).