मी BCCI ची माफी मागतो, मोहम्मद शमीनं असं काय केलं? चक्क क्रिकेट बोर्डाची माफी मागावी लागली, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मी BCCI ची माफी मागतो, मोहम्मद शमीनं असं काय केलं? चक्क क्रिकेट बोर्डाची माफी मागावी लागली, पाहा

मी BCCI ची माफी मागतो, मोहम्मद शमीनं असं काय केलं? चक्क क्रिकेट बोर्डाची माफी मागावी लागली, पाहा

Oct 27, 2024 10:50 PM IST

Mohammed Shami Apologies Fans And Bcci : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी निवड झालेली नाही. आता शमीने मोठे वक्तव्य केले आहे.

मी BCCI ची माफी मागतो, मोहम्मद शमीनं असं काय केलं? चक्क क्रिकेट बोर्डाची माफी मागावी लागली, पाहा
मी BCCI ची माफी मागतो, मोहम्मद शमीनं असं काय केलं? चक्क क्रिकेट बोर्डाची माफी मागावी लागली, पाहा

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने चाहत्यांची आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) माफी मागितली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शमीची निवड केली नाही. कारण तो अद्याप मॅच फिटनेस गाठू शकलेला नाही. शमी सध्या एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे.

पण गुडघ्याला सूज आल्याने त्याच्या पुनरागमनाची योजना रखडली होती. मात्र, शमीने नुकतेच जाहीर केले होते की, त्याला कोणताही त्रास होत नाही. शमीने इंस्टाग्रामवर आपल्या ट्रेनिंगचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की तो लवकरच पुनरागमन करणार आहे.

'मी चाहत्यांची आणि बीसीसीआयची माफी मागतो'

'ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड न झाल्याने ३४ वर्षीय शमी म्हणाला, ‘मी दिवसेंदिवस माझ्या गोलंदाजीचा फिटनेस सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. सामन्यांच्या तयारीसाठी आणि देशांतर्गत लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यासाठी कठोर परिश्रम करत राहीन. मी सर्व क्रिकेट चाहत्यांची आणि बीसीसीआयची माफी मागतो. लवकरच मी रेड बॉल क्रिकेट खेळायला तयार होईन, तुम्हा सर्वांवर माझे प्रेम आहे’.

दुखापतीतून सावरल्यानंतर शमी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटकविरुद्ध तो बंगालकडून रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही. या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांचाही संघात समावेश आहे.

मोहम्मद शमीची क्रिकेट कारकीर्द

३४ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत ६४ कसोटी, १०१ एकदिवसीय आणि २३ टी-20 सामने खेळले आहेत. शमीने कसोटीत २२९, एकदिवसीय सामन्यात १९५ आणि टी-20 मध्ये २४ बळी घेतले आहेत.

Whats_app_banner