सचिन, सूर्या ते रोहित शर्मा... भारतीय क्रिकेटपटूंनी खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  सचिन, सूर्या ते रोहित शर्मा... भारतीय क्रिकेटपटूंनी खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पाहा

सचिन, सूर्या ते रोहित शर्मा... भारतीय क्रिकेटपटूंनी खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पाहा

Jan 26, 2025 07:30 PM IST

Indian Cricketers Wishes On Republic Day : आज देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. भारतीय क्रिकेटपटूंनी देशवासीयांना आणि चाहत्यांना खास प्रसंगी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आदींनी फेसबुकवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्विट केले आहे.

सचिन, सूर्या ते रोहित शर्मा... भारतीय क्रिकेटपटूंनी खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पाहा
सचिन, सूर्या ते रोहित शर्मा... भारतीय क्रिकेटपटूंनी खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पाहा

देशभरात आज (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. आजचा दिवस भारताच्या इतिहासात खूप खास मानला जातो. कारण आजच्याच दिवशी १९५० मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली. या अतिशय खास प्रसंगी भारतीय क्रिकेटपटूंनीही चाहत्यांना आणि देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सोशल मीडियावर कोणत्या खेळाडूंनी त्यांच्या शैलीत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यामधअये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने इंस्टाग्रामवर तिरंग्यासोबतचे त्याचे फोटो शेअर करताना लिहिले, की ‘तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.’

भारताचा टी-20 मधील कर्णधार आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याने लिहिले, ‘प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. या समृद्ध आणि सुंदर राष्ट्राचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. आम्हाला आमच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा अभिमान आहे. तसेच, आता आम्ही सोनेरी भविष्याची वाट पाहत आहोत’.

भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंस्टाग्रामवर तिरंग्यासोबतचा फोटो पोस्ट करून त्याच्या कॅप्शनमध्ये फक्त भारतीय ध्वजाचा इमोजी शेअर केला आहे.

 

क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकर याने ट्विटरवर लिहिले की, 'हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत, शहरांपासून शांत गावांपर्यंत, आमची ताकद आमच्या विविधतेत आहे. या अतुलनीय देशाचे भारताचे नागरिक असल्याचा अभिमान आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!'

Whats_app_banner

संबंधित बातम्या