Vinod Kambli : विनोद कांबळी हॉस्पिटलमध्ये नाचतोय, नववर्षापूर्वी तब्येतीत कमालीची सुधारणा, व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Vinod Kambli : विनोद कांबळी हॉस्पिटलमध्ये नाचतोय, नववर्षापूर्वी तब्येतीत कमालीची सुधारणा, व्हिडिओ व्हायरल

Vinod Kambli : विनोद कांबळी हॉस्पिटलमध्ये नाचतोय, नववर्षापूर्वी तब्येतीत कमालीची सुधारणा, व्हिडिओ व्हायरल

Dec 31, 2024 10:49 AM IST

Vinod Kambli News : विनोद कांबळीचा हॉस्पिटलमधील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Vinod Kambli : विनोद कांबळी हॉस्पिटलमध्ये नाचतोय, नववर्षापूर्वी तब्येतीत कमालीची सुधारणा, व्हिडिओ व्हायरल
Vinod Kambli : विनोद कांबळी हॉस्पिटलमध्ये नाचतोय, नववर्षापूर्वी तब्येतीत कमालीची सुधारणा, व्हिडिओ व्हायरल

Vinod Kambli Health Update : विनोद कांबळी आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ठाण्यातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कांबळीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तो डान्स करताना दिसत आहे. भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या या माजी डावखुऱ्या फलंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

५२ वर्षीय विनोद कांबळी याला या महिन्याच्या सुरुवातीला मूत्रमार्गात संसर्ग आणि स्नायूंना दुखापती झाल्या होत्या. त्यानंतर त्याला २१ डिसेंबर रोजी भिवंडी शहरातील काल्हेर भागातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर, त्याच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाल्याचे अनेक वैद्यकीय अहवालातून समोर आले.

पण आाता विनोद कांबळी याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, आता कांबळी चक दे! इंडिया चित्रपटाच्या शीर्षक गीतावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. रुग्णालयाचा सपोर्ट स्टाफदेखील त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. यापूर्वी कांबळीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने त्याला पाठिंबा दिल्याबद्दल लोकांचे आभार मानले होते.

मुंबईच्या माजी क्रिकेटपटूने उपचारादरम्यान रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर यांचेही आभार मानले आहेत. नुकतेच कांबळीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते की, त्याला स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कांबळी बरा झाल्यानंतर त्याला १०० पैकी फक्त ८०-९० टक्के जुन्या आठवणी परत मिळू शकतील.

दरम्यान, गेल्या महिन्यात प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शिवाजी पार्कवर झालेल्या कार्यक्रमात कांबळी त्याच्या वयापेक्षा खूपच मोठा दिसत आणि अतिशय अशक्त दिसत होता. यानंतर कांबळीच्या प्रकृतीबाबाबत चर्चेला उधाण आले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या