मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टीम इंडियात दारू सगळेच पितात, पण त्यांनी माझी प्रतिमा खराब केली, प्रवीण कुमार भडकला

टीम इंडियात दारू सगळेच पितात, पण त्यांनी माझी प्रतिमा खराब केली, प्रवीण कुमार भडकला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 10, 2024 12:03 PM IST

Praveen Kumar Interview : प्रवीण कुमारला दारूचे व्यसन होते आणि यामुळे त्याचे सहकारी खेळाडू त्याच्यावर अनेकदा नाराज असायचे. दारूमुळे प्रवीणकुमारची इमेजही खराब झाली.

Praveen Kumar (without cap) celebrating with teammates
Praveen Kumar (without cap) celebrating with teammates (AFP)

टीम इंडियाचा स्विंग गोलंदाज प्रवीण कुमार २०११ चा विश्वचषक खेळणार हे निश्चित मानले जात होते. त्याची वर्ल्डकप संघात निवडदेखील झाली होती. पण अखेरच्या क्षणी दुखापतीमुळे त्याला बाहेर वर्ल्डकप संघातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर श्रीशांतची वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय संघात निवड करण्यात आली.

दुखापतीनंतर प्रवीण कुमारने टीम इंडियामध्ये पुनरागमन केले, पण त्याचे करिअर फारकाळ टिकले नाही. मैदानावर त्याची वर्तणूक अतिशय आक्रमक असायची, त्यामुळे त्याला अनेकदा वॉर्निंगही देण्यात आली होती. तसेच, मैदानाबाहेरही त्याची जीवनशैली वादग्रस्त होती.

प्रवीण कुमारला दारूचे व्यसन होते आणि यामुळे त्याचे सहकारी खेळाडूही त्याच्यावर अनेकदा नाराज असायचे. दारूमुळे प्रवीणकुमारची इमेजही खराब झाली. यामुळेच त्याने क्रिकेट सोडल्यानंतर त्याच्या राज्याकडून त्याला डोमेस्टिक सर्किटमध्ये कोचिंगचेही काम मिळाले नाही.

यावर आता प्रवीणकुमारने काही खुलासे केले आहेत. त्याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या करिअरशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मद्यपान केल्याने आपली प्रतिमा कशी डागाळली हेही त्याने सांगितले.

प्रवीणकुमार नेमकं काय म्हणाला?

प्रवीणने लल्लन टॉपच्या मुलाखतीत सांगितले की, आयपीएलमधील कोणत्याही फ्रँचायझीचे प्रशिक्षक बनणे सोडा, अगदी उत्तर प्रदेशच्या रणजी संघानेही त्याला गोलंदाजी प्रशिक्षक बनण्याची संधी दिली नाही.

प्रवीण म्हणाला, 'मला कोचिंगसाठी बोलावले नाही कारण मी दारू प्यायचो, अरे बाबांनो, पण मी मैदानावर थोडे दारू पितो किंवा ड्रेसिंग रूममध्ये पितो? दारू सगळेच पितात पण त्यांना माझी प्रतिमा खराब करायची होती आणि त्यांनी ती केली. पण आजही ड्रेसिंग रूममध्ये माझे मित्र आहेत जे माझ्यासोबत खूप चांगले आहेत".

प्रवीण कुमारने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. तर त्याने शेवटचा आयपीएल सामना गुजरात लायन्सकडून २०१७ मध्ये खेळला. तेव्हापासून प्रवीणकुमार क्रिकेटमधून गायब झाला. त्याला कोचिंगची नोकरी मिळाली नाही. अशा परिस्थितीत या मुलाखतीनंतर त्याचे नशीब बदलते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi