Nitish Kumar Reddy Grand Welcome At Airport : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी ऑस्ट्रेलियातून भारतात परतला आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळून मायदेशी परतल्यानंतर नितीश रेड्डी याचे भव्य स्वागत करण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विशाखापट्टणम विमानतळावर नितीश याचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळल्यानंतर नितीश रेड्डी विशाखापट्टणम येथील त्याच्या घरी पोहोचला. येथे नितीशला जीपमधून नेण्यात आले. जीपला फुलांचा मोठा हार लावलेला होता. याशिवाय ठिकठिकाणी ढोल-ताशांचा गजरात त्याला एयरपोर्टवरून घरापर्यंत नेण्यात आले.
अष्टपैलू नितीश रेड्डीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधून भारताकडून कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या मालिकेतच नितीशने प्रभावी कामगिरी केली. फलंदाजी करताना त्याने ५ सामन्यांच्या ९ डावात ३७.२५ च्या सरासरीने २९८ धावा केल्या. मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला.
नितीशच्या बॅटमधून एक शतकही पाहायला मिळाले. याशिवाय गोलंदाजी करताना रेड्डीने ३८च्या सरासरीने ५ बळी घेतले. अशाप्रकारे नितीशने या मालिकेत टीम इंडियासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली.
नितीश रेड्डी याने भारतासाठी आतापर्यंत ५ कसोटी आणि ३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या ९ डावात फलंदाजी करताना नितीशने ३७.२५ च्या सरासरीने २९८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १ शतक झळकावले आहे. याशिवाय ९ डावात गोलंदाजी करताना, रेड्डीने ३८ च्या सरासरीने ५ विकेट घेतल्या.
याशिवाय, टी-20 इंटरनॅशनलच्या ३ डावांमध्ये रेड्डीने ४५ च्या सरासरीने आणि १८० च्या स्ट्राइक रेटने ९० धावा केल्या. या काळात त्याने १ अर्धशतक झळकावले. तर ३ डावात गोलंदाजी करताना नितीशने ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या.
संबंधित बातम्या