Mohammed Shami : मोहम्मद शमी याच्यावर खरं वय लपवल्याचा आरोप, ड्रायव्हिंग लायसन्सवरून सत्य समोर, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Shami : मोहम्मद शमी याच्यावर खरं वय लपवल्याचा आरोप, ड्रायव्हिंग लायसन्सवरून सत्य समोर, पाहा

Mohammed Shami : मोहम्मद शमी याच्यावर खरं वय लपवल्याचा आरोप, ड्रायव्हिंग लायसन्सवरून सत्य समोर, पाहा

Nov 16, 2024 04:14 PM IST

Mohammed Shami News In Marathi : भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. वय लपवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

Mohammed Shami Age Fraud : मोहम्मद शमीवर खरं वय लपवल्याचा आरोप, ड्रायव्हिंग लायसन्सवरून सत्य समोर आलं, पाहा
Mohammed Shami Age Fraud : मोहम्मद शमीवर खरं वय लपवल्याचा आरोप, ड्रायव्हिंग लायसन्सवरून सत्य समोर आलं, पाहा (HT_PRINT)

मोहम्मद शमी हा भारतीय क्रिकेटमधील महान गोलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक बळी घेतले आहेत आणि दुखापतीतून नुकतेच पुनरागमन केल्यामुळे तो चर्चेत आहे. पण आता मोहम्मद शमी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

मोहम्मद शमीने आपले खरे वय लपवून फसवणुक केल्याचा आरोप त्याच्यावर केला जात आहे.

शमी हा २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे, परंतु त्याच्या वयात गडबड असल्याच्या अफवा त्याच्या बदनामीचे कारण बनल्या आहेत. याच कारणामुळे शमीला ट्रोल देखील केले जात आहे.

मोहम्मद शमी याला गेल्या काही वर्षांत खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्याची पत्नी हसीन जहाँन हिनेही त्याच्यावर घरगुती छळ आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते. पण यात चांगली गोष्ट म्हणजे बीसीसीआयने फिक्सिंग प्रकरणात शमीला खूप आधी क्लीन चिट दिली आहे.

अशाताच आता मोहम्मद शमी याच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शमीचे वय ४२ वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सचं सत्य

मोहम्मद शमीचा ड्रायव्हिंग लायसन्स एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे पाहता हे स्पष्ट होते की शमीचे वय ४२ वर्षे आहे. परंतू तो स्वत: ३४ वर्षांचा आहे. वयात ८ वर्षांचा फरक आढळल्यानंतर लोक शमीला ट्रोल करण्यात व्यस्त आहेत.

आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे X वरची ही पोस्ट, जी पॉलिसीचे उल्लंघन करत होती, ती हटवण्यात आली आहे. पण इतर लोकांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट काढण्यात आणि सोशल मीडियावर पुन्हा शेअर करण्यास वेळ लावला नाही.

हा ड्रायव्हिंग लायसन्स फोटो खरा आहे की एडिट केलेला आहे, याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही. हा फोटो केवळ शमीवरच नाही तर बीसीसीआयवरही प्रश्न उपस्थित करत आहे.

भारतात वय लपवणे आणि फसवणूक करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. एखाद्या क्रिकेटपटूने वय लपवल्यास त्याला दंड आणि काहीवेळा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. भारतीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, वयाची फसवणूक सहसा अंडर-१९ दिवसांमध्ये होते जेव्हा खेळाडू संघात निवड होण्यासाठी त्यांचे वय एक किंवा दोन वर्षे कमी असल्याचे घोषित करतात.

Whats_app_banner