Axar Patel : अक्षर पटेलच्या घरी पाळणा हलला! मुलाचा पहिला फोटो शेअर केला आणि नावही सांगितलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Axar Patel : अक्षर पटेलच्या घरी पाळणा हलला! मुलाचा पहिला फोटो शेअर केला आणि नावही सांगितलं

Axar Patel : अक्षर पटेलच्या घरी पाळणा हलला! मुलाचा पहिला फोटो शेअर केला आणि नावही सांगितलं

Dec 24, 2024 08:30 PM IST

Axar Patel Baby Boy : टीम इंडियाचा क्रिकेटपटू अक्षर पटेल याने गोड बातमी दिली आहे. त्याची पत्नी मेहा हिने एका मुलाला जन्म दिला आहे. अक्षर आणि मेहा यांनी त्यांच्या मुलाचे नावही ठेवले आहे.

Axar Patel : अक्षर पटेलच्या घरी पाळणा हलला! मुलाचा पहिला फोटो शेअर केला आणि नावही सांगितलं
Axar Patel : अक्षर पटेलच्या घरी पाळणा हलला! मुलाचा पहिला फोटो शेअर केला आणि नावही सांगितलं

Axar Patel and Meha blessed with a baby : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अक्षर पटेल  याने खूपच आनंदाची बातमी दिली आहे. अक्षरची पत्नी मेहा हिने मुलाला जन्म दिला आहे. अक्षरने मंगळवारी संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली.

१९ डिसेंबरला मेहाला मुलगा झाला. विशेष म्हणजे अक्षर आणि मेहा यांनी त्यांच्या मुलाचे नावही ठेवले आहे. अक्षरने आपल्या मुलाला टीम इंडियाची जर्सीही घातली आहे.

वास्तविक, अक्षर पटेलने मंगळवारी संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने टीम इंडियाची जर्सी घातलेल्या आपल्या मुलाचा फोटो शेअर केला. मात्र त्याने बाळाचे तोंड दाखवलेले नाही. अक्षरने कॅप्शनमध्ये लिहिले की, "तो अजूनही त्याच्या पायाने ऑफ साइडचा शोध घेत आहे."

IND W vs West Indies W: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतून भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करणाऱ्या भारताची युव.....

पण टीम इंडियाच्या जर्सीमध्ये तुम्हा सर्वांना त्याची ओळख करून देण्यासाठी आम्ही स्वताला रोखू शकत नाही. भारतातील सर्वात लहान, तरीही सर्वात मोठा चाहता आणि आमच्या हृदयाचा तुकडा असलेल्या हक्ष पटेलचे स्वागत आहे.

अक्षर आणि मेहाच्या मुलाचे नाव काय?

अक्षर आणि मेहा यांचे जानेवारी २०२३ मध्ये लग्न झाले. या दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक होती. अक्षर आणि मेहा यांचे लग्न वडोदरात झाले. या दोघांनी २०२२ मध्ये एंगेजमेंट केली होती. यानंतर आता मेहाने मुलाला जन्म दिला आहे. अक्षर आणि मेहा यांनी त्यांच्या मुलाचे नाव हक्ष ठेवले आहे. अक्षरने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्येही याचा उल्लेख केला आहे.

अक्षर पटेलची क्रिकेट कारकिर्द

अक्षर पटेलने अनेक प्रसंगी टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली आहे. अक्षरने भारतासाठी ६० एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ५६८ धावा केल्या आहेत. यासोबतच ६४ विकेट्सही घेतल्या आहेत. 

अक्षरने १४ कसोटी सामन्यात ६४६ धावा केल्या आहेत. तसेच, ५५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टी-20 इंटरनॅशनलमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे. अक्षरने या फॉरमॅटमध्ये ६६ सामने खेळताना ४९८ धावा केल्या आहेत. यासोबतच ६५ विकेट्सही घेतल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या