Ashish Nehra Gift House His Coach : भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा सध्या प्रशिक्षक आणि कॉमेंटेर म्हणून कार्यरत आहे. नेहरा आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. नेहराच्या प्रशिक्षणात गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्याच सीझनमध्ये (२०२२) विजेतेपद पटकावले.
आता IPL २०२५ च्या आधी, आशिष नेहरा हा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, इतर क्रिकेटपटूंसाठी उदाहरण ठरावे, असे काम आशीष नेहरा याने केले आहे. वास्तविक, आशिष नेहराने आपल्या बालणीच्या प्रशिक्षकांना एक घर गिफ्ट दिले आहे.
आशिष नेहराच्या या कौतुकास्पद कार्याचा खुलासा समालोचक आणि क्रीडा प्रसारक पदमजीत सेहरावत यांनी WONE SOCIAL ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. आशिष नेहराने त्याचे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांना घर कसे गिफ्ट दिले होते ते त्यांनी सांगितले.
आशिष नेहरा दिल्लीच्या सोनेट क्रिकेट अकादमीमध्ये खेळायचा. टीम इंडियाचा भाग असूनही आशिष नेहरा अनेकदा सोनेट अकादमीमध्ये जात असे. एके दिवशी जेव्हा कोच अकादमीत उशिरा आले, तेव्हा नेहरा म्हणाला की तुम्ही इतक्या उशिरा आलात तर मुलांना कसं शिकवणार? यानंतर नेहराला समजले की कोचला भाड्याचे घर रिकामे करण्याची नोटीस मिळाली होती, त्यामुळे ते दुसरे घर शोधत होते आणि यामुळे त्यांना अकादमीत येण्यास उशीर झाला. मग काय? नेहराने ठरवले की तो कोचला घर भेट देईल आणि त्याने अवघ्या ३ दिवसात तसे करून दाखवले.
पदमजीत सेहरावत म्हणाले, "प्रशिक्षक तारक सिन्हा उशिरा आले. आशिष नेहराने विचारले, सर, तुम्ही उशीरा येत आहात, मुलांना काय शिकवणार. प्रशिक्षक म्हणाले, बेटा, तुम्ही एका वाड्यात राहता, मी भाड्याने राहतो. घरमालकाने नोटीस दिली आहे की, तुम्हाला २ दिवसांनी जागा सोडावी लागेल. मी घर बघायला गेलो, त्यामुळे वेळ लागला."
सेहरावत पुढे म्हणाले, की "पावसामुळे दोन दिवस नेट लागली नाही. तिसऱ्या दिवशी नेट लावण्यात आले आणि आशिष नेहरा ३ तास उशिरा आला होता. यावर तारक सिन्हा म्हणाले होते, की 'हा भाई टेस्ट प्लेयर त्या दिवशी तर मला वेळेवर येण्यासाठी खूप चांगले ज्ञान देत होतास.' असे म्हणताच, आशिष नेहराने खिशातून चावी काढली आणि म्हणाला की, ज्याचे गुरुदेव भाड्याच्या घरात राहतात, त्यांचयासाठी घर शोधायला वेळ किमान तीन दिवस तर लागतीलच ना? ही तुमच्या नवीन घराची चावी. नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तूम्ही १० दिवसात शिफ्ट होऊन जा."
संबंधित बातम्या