Indian Cricket Team ODI Record : भारताने २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून, टीम इंडियाला वनडेची एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. संघाने अनेक वेळा आयसीसीच्या वनडे स्पर्धेची उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी गाठली आहे, परंतु त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही.
टीम इंडियाने गेल्या १० वर्षात एकदिवसीय स्पर्धेत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. पण संघाची कामगिरी मात्र, दमदार राहिली आहे. गेल्या १० वर्षांत भारताने सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
टीम इंडियाने २०१४ पासून आतापर्यंत एकूण २१५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये टीम इंडियाने १३६ जिंकले आणि ६७ गमावले. या कालावधीत संघाचे एकूण ४ सामने टाय झाले तर ८ अनिर्णित राहिले.
या यादीत इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. या काळात इंग्लंडने १९७ सामने खेळले, १०८ जिंकले आणि ७८ गमावले. या यादीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. टीम इंडियाने सर्वाधिक १३६ विजय मिळवले आहेत.
भारत- २१५ सामने- १३६ जिंकले आणि ६७ हरले
इंग्लंड- १९७ सामने- १०८ विजय आणि ७८ पराभव
ऑस्ट्रेलिया- १८४ सामने- १०८ जिंकले आणि ७१ गमावले
न्यूझीलंड-१८३ सामने- १०५ जिंकले आणि ६७ हरले
दक्षिण आफ्रिका- १७८ सामने- १०३ जिंकले आणि ६७ हरले.
२०१४ पासून, टीम इंडियाने एकूण ४ आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. प्रथम, टीम इंडियाने २०१५ एकदिवसीय विश्वचषक खेळला, ज्यामध्ये संघ उपांत्य फेरीत पोहोचला, परंतु विजेतेपद मिळवण्यापासून वंचित राहिला.
त्यानंतर टीम इंडियाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेतला. या स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला, पण विजेतेपद मिळवू शकला नाही.
यानंतर टीम इंडियाने २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक खेळला. या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला, पण चॅम्पियन होऊ शकला नाही.
त्यानंतर २०२३ मध्ये टीम इंडियाने मायदेशात एकदिवसीय विश्वचषक खेळला. घरच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या स्पर्धेत टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली होती, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
संबंधित बातम्या