Hong Kong Sixes : ५ षटकांचा सामना, संघात केवळ ६ खेळाडू खेळतील, टीम इंडिया हॉंग कॉंग सिक्सेस स्पर्धेत खेळणार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Hong Kong Sixes : ५ षटकांचा सामना, संघात केवळ ६ खेळाडू खेळतील, टीम इंडिया हॉंग कॉंग सिक्सेस स्पर्धेत खेळणार

Hong Kong Sixes : ५ षटकांचा सामना, संघात केवळ ६ खेळाडू खेळतील, टीम इंडिया हॉंग कॉंग सिक्सेस स्पर्धेत खेळणार

Oct 07, 2024 08:47 PM IST

Team India Hong Kong Sixes : भारतीय क्रिकेट संघ हाँगकाँग सिक्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत एका संघात फक्त ६ खेळाडू खेळतात.

Hong Kong Sixes : ५ षटकांचा सामना, संघात केवळ ६ खेळाडू खेळतील, टीम इंडिया हॉंग कॉंग सिक्सेस स्पर्धेत खेळणार
Hong Kong Sixes : ५ षटकांचा सामना, संघात केवळ ६ खेळाडू खेळतील, टीम इंडिया हॉंग कॉंग सिक्सेस स्पर्धेत खेळणार (AP)

भारतीय क्रिकेट संघ हाँगकाँग सिक्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही एक अतिशय मनोरंजक स्पर्धा आहे. यामध्ये सामना फक्त ५ षटकांचा सामना खेळला जातो. प्रत्येक संघ ५-५ षटके खेळतो. यासोबतच एका संघात जास्तीत जास्त फक्त ६ खेळाडू खेळू शकतात. टीम इंडिया या टूर्नामेंटमध्ये खेळणार आहे.

याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हाँगकाँग सिक्स टूर्नामेंट १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.

ही स्पर्धा हाँगकाँगमधील टिन क्वांग रोड क्रिकेट मैदानावर होणार आहे. टीम इंडियाही या स्पर्धेत सहभागी होणार आहे. जीएनटीने दिलेल्या वृत्तानुसार, या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडियाचा संघही येथे खेळण्यासाठी जाणार आहे.

मात्र, भारताकडून कोणते खेळाडू या स्पर्धेत खेळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. या खेळाचे नियम खूपच मनोरंजक आहेत. नवीन लोकांना क्रिकेटशी जोडणे हाही या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश आहे.

६ खेळाडूंचा संघ आणि १० षटकांचा सामना 

स्पर्धा रंजक होण्यासाठी त्याचे नियमही रंजक ठेवण्यात आले आहेत. एका सामन्यात फक्त १० षटके असतील. एका संघाला ५ षटकांत फलंदाजीची संधी मिळते. त्याच वेळी, एका संघातील फक्त ६ खेळाडू मैदान घेऊ शकतात. यष्टिरक्षक वगळता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला एक षटक टाकावे लागते. पाच षटके संपण्यापूर्वी सर्व खेळाडू बाद झाले, तर शेवटचा फलंदाज एकटाच फलंदाजी करू शकतो.

सचिन-लाराही या स्पर्धेत खेळले

ही स्पर्धा खूप जुनी आहे. याची सुरुवात १९९२ मध्ये झाली. मात्र निधीअभावी ते २०१७ मध्ये बंद पडले. मात्र, आता ते पुन्हा सुरू होणार आहे. महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि शेन वॉर्न हेदेखील या स्पर्धेत खेळले आहेत.

Whats_app_banner