मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस, संघाला १२५ कोटी मिळणार, जय शाह यांची घोषणा

T20 World Cup : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस, संघाला १२५ कोटी मिळणार, जय शाह यांची घोषणा

Jun 30, 2024 09:28 PM IST

T20 World Cup Prize Money : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला १२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे.

T20 World Cup : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस, संघाला १२५ कोटी मिळणार, जय शाह यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस, संघाला १२५ कोटी मिळणार, जय शाह यांची घोषणा (ANI )

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. त्याचवेळी, या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे.

टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला BCCI १२५ कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह काय म्हणाले?

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, " मला हे कळवताना अतिशय आनंद होत आहे की, भारतीय संघाला आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक जिंकल्यामुळे बक्षीस म्हणून १२५ कोटी रुपये मिळतील. भारतीय संघाने T20 विश्वचषकात उत्तम खेळ, प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली.

ट्रेंडिंग न्यूज

सामन्यात काय घडलं?

टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले, पण यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलच्या बळावर भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. विराट कोहलीने ५९ चेंडूत सर्वाधिक ७६ धावा केल्या.

त्याचवेळी भारताच्या १७६ धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा करू शकला. अशा प्रकारे टीम इंडियाने ७ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत सर्वाधिक ५२ धावा केल्या, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.

WhatsApp channel