Team India Victory Parade : विजयी मिरवणुकीत सामील व्हा, वानखेडेवर फ्री एन्ट्री, करावं लागेल फक्त एक काम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India Victory Parade : विजयी मिरवणुकीत सामील व्हा, वानखेडेवर फ्री एन्ट्री, करावं लागेल फक्त एक काम

Team India Victory Parade : विजयी मिरवणुकीत सामील व्हा, वानखेडेवर फ्री एन्ट्री, करावं लागेल फक्त एक काम

Updated Jul 04, 2024 12:50 PM IST

Team India Victory Parade at Mumbai : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनंतर T20 विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भारतीय चाहते २९ जूनपासून संघाच्या आगमनाची वाट पाहत होते.

टीम इंडियाच्या विजयी मिरवणूकीत सामील व्हा, वानखेडेवर फ्री एन्ट्री, फक्त हे काम करावं लागेल
टीम इंडियाच्या विजयी मिरवणूकीत सामील व्हा, वानखेडेवर फ्री एन्ट्री, फक्त हे काम करावं लागेल

Team India Victory Parade at Mumbai : टी-20 वर्ल्ड चॅम्पियन भारतीय क्रिकेट संघ भारतात दाखल झाला आहे. टीम इंडिया सध्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहे. यानंतर संपूर्ण टीम इंडिया आज संध्याकाळीच मुंबईत पोहोचेल, मुंबईत सेलिब्रेशनला आणखीनच रंग चढेल.

टीम इंडियाच्या विजयी मिरवणूकीत सामील व्हा, वानखेडेवर फ्री एन्ट्री, फक्त हे काम करावं लागले

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनंतर T20 विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भारतीय चाहते २९ जूनपासून संघाच्या आगमनाची वाट पाहत होते.

टीम इंडिया दिल्लीहून मुंबईला जाईल. जिथे टीम इंडियाची विजयी परेड काढण्यात येईल. त्यासाठी विशेष बस तयार करण्यात आली होती.

दरम्यान, एवढेच नाही तर टीम इंडियाच्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकता. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्हाला मोफत प्रवेश मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला वेळेचे भान ठेवावे लागेल.

संध्याकाळी ५ पासून मुंबईत विजयी परेड

भारतीय संघाची विजयी परेड संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल. त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली असून, त्याला आता अंतिम स्वरूप आले आहे. एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी परेड काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याचे अंतर सुमारे दीड ते दोन किलोमीटर आहे.

टीम इंडियाची ओपन बस हळूहळू पुढे जाईल. त्यामुळे मिरवणूकीस कदाचित एक ते दीड तास वेळ लागेल. त्यामुळे तुम्ही खेळाडूंना आरामात पाहू शकता.

वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश , फक्त…

ही मिरवणूक वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचेल. यानंतर वानखेडे स्टेडिमयवर होणाऱ्या या सोहळ्यासाठी तिकीट नसणार आहे. म्हणजेच तुम्ही या संपूर्ण कार्यक्रमाचा मोफत आनंद घेऊ शकाल. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली आहे. पण तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही संध्याकाळी ६ वाजण्यापूर्वी स्टेडियममध्ये प्रवेश केला पाहिजे.

यानंतर दरवाजे बंद होतील आणि प्रवेश नसेल. वानखेडे स्टेडियमची क्षमता सुमारे ५० हजार प्रेक्षकांची आहे. कार्यक्रमादरम्यान हे स्टेडियम खचाखच भरले जाण्याची शक्यता आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक तिथे पोहोचण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत तुम्ही वेळेवर पोहोचले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जागा मिळेल.

दिल्ली ते मुंबई उत्सवाचे वातावरण

आज सकाळी ६ वाजता टीम इंडिया दिल्लीत पोहोचली तेव्हा संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण होते. विमानतळावर एवढी गर्दी जमली होती की चाहत्यांना सांभाळणे कठीण झाले होते. सर्वसामान्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी आधीच ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली होती, परंतु त्यानंतरही चाहत्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते.

भारतीय संघाच्या आगमनाची बातमी मिळताच चाहते आपल्या स्टार खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. काहींना खेळाडूंना पाहण्याची संधी मिळाली तर काही मागे राहिले. दिल्लीनंतर आता मुंबईतही सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या