T20 WC 2024 : टीम इंडियाची वर्ल्डकपची जर्सी ‘चुकून’ लीक? सोशल मीडियावर चाहत्यांनी उडवली खिल्ली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 : टीम इंडियाची वर्ल्डकपची जर्सी ‘चुकून’ लीक? सोशल मीडियावर चाहत्यांनी उडवली खिल्ली

T20 WC 2024 : टीम इंडियाची वर्ल्डकपची जर्सी ‘चुकून’ लीक? सोशल मीडियावर चाहत्यांनी उडवली खिल्ली

May 06, 2024 06:28 PM IST

Team India T20 World Cup 2024 Jersey : सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतटी-20 वर्ल्डकप २०२४ ची टीम इंडियाची जर्सी असल्याचे बोलले जात आहे.

 टीम इंडियाची वर्ल्डकपची जर्सी ‘चुकून’ लीक? सोशल मीडियावर चाहत्यांनी उडवली खिल्ली
टीम इंडियाची वर्ल्डकपची जर्सी ‘चुकून’ लीक? सोशल मीडियावर चाहत्यांनी उडवली खिल्ली

indian cricket team t20 world cup 2024 jersey : टी-20 विश्वचषक २०२४ हळूहळू जवळ येत आहे. तस तशा या स्पर्धेबाबतच्या घडामोडीही समोर येत आहेत. पण, सध्या आयपीएल २०२४ चा थरार सुरू आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या बातम्यांना जास्त प्रसिद्धी मिळताना दिसत नाही.

पण अशातच आता टीम इंडियाच्या नव्या जर्सीचा लुक लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही जर्सी टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये परिधान करणार आहेत. या जर्सीचे अधिकृत लॉंचिंग अद्याप झालेले नाही. पण त्या जर्सीचा लुक सर्वांसमोर आल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जर्सीच्या फोटोंमध्ये दिसत आहे, की जर्सीचा गळा व्ही शेपमध्ये आहे. गळ्याचा भाग तिरंगी कलरचा आहे. हा भारतीय तिरंग्याचा कलर आहे. तर जर्सीचा मोठा भाग निळ्या रंगाचा आहे. तर जर्सीच्या बाजूने भगवा रंग आहे. म्हणजेच जर्सी निळ्या आणि भगव्या रंगाची आहे. याशिवाय खांद्यावर आदिदासच्या तीन पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याही दिसत आहेत. तसेच, छातीवर बीसीसीआयचा लोगो आहे.

अशा प्रकारच्या जर्सीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पण टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे खेळाडूच हीच जर्सी घालतील, हे नक्की नाही. कारण अधिकृत रित्या याबाबत माहिती उपलब्ध नाही.

तसेच, व्हायरल झालेली जर्सी चाहत्यांना अजिबात पसंत नाही. काहीजण याला वाईट म्हणत आहेत तर काहीजण या जर्सीला ट्रेनिंग किट म्हणत आहेत. टीम इंडियाची जर्सी कशी असेल, याबाबत आपल्याला जर्सीच्या अधिकृत लाँचची प्रतीक्षा करावी लागेल.

Team India T20 World Cup 2024 Jersey
Team India T20 World Cup 2024 Jersey

टीम इंडियाचा पहिला सामना ५ जूनला

T20 विश्वचषक १ जूनपासून सुरू होणार आहे, परंतु टीम इंडिया टूर्नामेंटचा पहिला सामना बुधवारी ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना रविवारी ९ जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे.

T20 विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, चहल. मोहम्मद सिराज.

Whats_app_banner