टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया प्रथम बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचली. भारतीय संघाचे विमान दुपारी तीनच्या सुमारास दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास विस्तारा फ्लाइट क्रमांक 'UK1845' टीम इंडियाला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले.
या विमानाला विमानतळावर विशेष खास ट्रिब्यूट देण्यात आले. कारण खेळाडू बाहेर येण्यापूर्वी विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. टीम इंडियाच्या सन्मानार्थ दोन फायर इंजिन विमानाच्या दोन्ही बाजूला उभे राहून पाणी फवारताना दिसले.
वॉटर सॅल्यूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक कमेंटमध्ये भारतीय संघाबद्दल खूप आदरही दाखवत आहेत.
विमानातील क्रू मेंबर्स, त्यात बसलेले लोक आणि त्या विमानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी वॉटर सॅल्यूट दिला जातो. कोणतीही विशेष कामगिरी किंवा पराक्रम घडवल्यानंतर वॉटर सॅल्यूटद्वारे आदर दर्शविला जातो. भारतीय संघाने २०२४ चा T20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला असल्याने संघातील सर्व खेळाडूंना वॉटर सॅल्यूट देण्यात आला आहे.
भारतीय खेळाडूंसाठी आजचा खूप व्यस्त राहिला आहे. कारण सकाळी बार्बाडोसहून उतरल्यानंतर अवघ्या काही तासांनी संपूर्ण संघ पीएम मोदींच्या निवासस्थानी गेला, त्यांच्यासोबत नाश्ता केला आणि आता मुंबईत आला.
मुंबईत पोहोचल्यानंतरही भारतीय संघ खूप व्यस्त असणार आहे. विमानतळावरून संघाला त्या ठिकाणी नेले जाईल जिथून टीम इंडियाची विजयी परेड सुरू होईल. हा रोड शो मरीन ड्राईव्ह परिसरात होणार असून येथे ही टीम खुल्या बसमधून वानखेडे स्टेडियमवर पोहोचेल. यानंतर या मैदानावर एक खास कार्यक्रम होणार आहे. BCCI भारतीय संघातील खेळाडूंमध्ये १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम वितरित करणार आहे.
संबंधित बातम्या